Maharashtra: छत्रपती संभाजीनगरातील हिंसा राजकीय की धार्मिक? काय आहे थेअरी? - Mumbai Tak - maharashtra chhatrapati sambhajinagar violent clash during ramnavami was political or communal what does theory says - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Maharashtra: छत्रपती संभाजीनगरातील हिंसा राजकीय की धार्मिक? काय आहे थेअरी?

छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचाराबाबत अनेक शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. सोबतच पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
Many possibilities are being expressed regarding the violence in Chhatrapati Sambhajinagar.

छत्रपती संभाजीनगर : राम नवमी उत्सवाची तयारी सुरू असतानाच झालेल्या हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. पोलीस प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शहारातील चौका-चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंदु-मुस्लीम समुदायांमध्ये शांतता समितीच्या बैठका सुरु आहेत. (Chhatrapati Sambhajinagar Violence Incident political or religious?)

अशात आता झालेल्या या हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरमधील घटनेबाबत अनेक शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. सोबतच पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. हा हिंसाचार राजकीय होता की धार्मिक आणि दोन समुदायांमधील होता? असा सवाल विचारण्यात येत आहे.

हेही वाचा : नाशिक : काळाराम मंदिरात संयोगिता राजेंसोबत घडला धक्कादायक प्रकार

काय आहेत शक्यता?

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत सध्या दोन शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. पहिली शक्यता अशी की, राम मंदिराबाहेर काही समाज विघातक घटकांमध्ये एका छोट्या कारणावरुन भांडण झालं, पण वादातून सुरू झालेल्या भांडणाचं रुपांतर हिंसाचारात झालं, काही हिंसक घटकांनी या प्रकरणाला धर्माशी जोडलं आणि नंतर दंगलखोरांच्या जमावाने हल्ला केला.

दुसरी शक्यता अशी की, औरंगाबादच्या नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 15 दिवसांपासून आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी हिंदू संघटनांनी संभाजीनगर नावाच्या बाजूने रॅली काढली होती, त्यादरम्यान औरंगाबाद नावाचा फलक काढून टाकण्यात आला होता, त्यामुळे हिंसाचारामागे हेही कारण असू शकते.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : ओहरमध्ये दोन गटात तुफान दगडफेक, 7 लोक जखमी

हिंसाचार म्हणजे मोठं षडयंत्र?

स्थानिकांच्या आरोपांनुसार, राम नवमीदिवशी शहाराचं वातावरण खराब करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आलं. राधेश्याम शर्मा म्हणाले, इथे आजपर्यंतच वातावरण अत्यंत शांत होतं. पण आता जे झालं ते अत्यंत निंदनीय होतं. दोन्ही समुदायांना भडकविण्यासाठी होतं. पण त्यांचाही रमजानचा महिना आहे, त्यांचा नमाज शांततेत व्हायला पाहिजे, राम मंदिरातील भजन, किर्तन शांततेत पार पडायला पाहिजे. जे काही झालं ते खूपचं निंदनीय होतं.

स्थानिकांच्या आरोपांनुसार हिंसाचारामागे काही तरी मोठं षडयंत्र होतं. यामुळे दोन्ही समुदायांमधील बंधूभावात फूट पडली आहे. काल गाड्या वगैरे जाळ्यात आल्या. कमीत कमी १३ गाड्या जाळण्यात आल्या. बाकी दुकानांना कुठेही धक्का लागलेला नाही. षडयंत्र काही तरी मोठं होतं. पण ते अयशस्वी झालं.

हेही वाचा : सोमय्यांच्या हाती 20 जणांची साक्ष; ‘जवाब दो’ म्हणत परबांना पुन्हा डिवचलं

पोलील प्रशासनावरही प्रश्नचिन्ह

दरम्यान, या हिंसाचारानंतर पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पोलीसांच्या बेजबाबदारपणामुळे हा हिंसाचार झाला का? हिंसाचाराच्या ठिकाणी पोलीस उशीरा पोहोचले का? वातावरण खराब होतं तर सुरक्षेसाठी काही उपाय का केले नाहीत? जर हिंसाचाराच्या ठिकाणी वेळेत पोहचले तर पोलिसांनी दंगेखोरांची धडपकड का केली नाही?

Janhvi Kapoor: अ‍ॅडल्ट साइटवर होता जान्हवी कपूरचा फोटो… राघव-परिणीतीच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका!