मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर फडणवीस आणि आव्हाडांमध्ये पुन्हा ट्विटर वॉर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधला. मी आता फक्त लॉकडाउनचा इशारा देतोय, पुढील दोन दिवसांमध्ये मी तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करणार आहे. जर दुसरा पर्याय मिळाला नाही तर मग आपल्याला लॉकडाउन करावंच लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अर्ध्या तासाच्या आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राज्यातील वाढत असलेली रुग्णसंख्या, […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधला. मी आता फक्त लॉकडाउनचा इशारा देतोय, पुढील दोन दिवसांमध्ये मी तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करणार आहे. जर दुसरा पर्याय मिळाला नाही तर मग आपल्याला लॉकडाउन करावंच लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अर्ध्या तासाच्या आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राज्यातील वाढत असलेली रुग्णसंख्या, आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण इथपासून ते टीका करणाऱ्या विरोधकापर्यंत ते सल्ले देणाऱ्या उद्योगपतींचाही समाचार घेतला.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना राजकारण न करण्याचा सल्ला दिल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आपल्या ट्विटर हँडलवर पाश्चिमात्य देशांनी लॉकडाउन काळात लोकांची व आपल्या देशातील रोजगाराची कशी काळजी घेतली याचे दाखले दिले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पाश्चिमात्य देशांमध्येही दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लॉकडाउन लावण्यात आल्याचं सांगितलं होतं.
फ्रान्सने तिसर्यांदा लॉकडाऊन लावला…
पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले…हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’…
पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…#CoronaInMaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021
डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती…
पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज…ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत…
पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्यांना मदत
एवढेच नाही तर वेतन न मिळणार्यांना 800 युरोंपर्यंत मदत !#CoronaInMaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021
बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय…
पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय…पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…
पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले…#CoronaInMaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021
आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत…
पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय…फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत…
पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय…#CoronaInMaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021
युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय…
तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!
विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021
यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना गेल्या वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरच आहोत आणि पुन्हा रस्त्यावर येऊन लोकांना समजावून सांगण्यासाठी, त्यांच्या मदतीला धावून जाण्याचीही तयारी असल्याचं म्हणत टोला लगावला.
हे वाचलं का?
होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…
आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची…#CoronaInMaharashtra @CMOMaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही फडणवीसांना…तुम्ही नमूद केलेले पैसे हे त्या देशातील केंद्र सरकारने दिले आहेत. आपलं केंद्र सरकार काय देणार…अजुन राज्याच्या हक्काचे पैसे मिळत नाहीयेत. बघा काही मिळतं का तुमचं वजन वापरुन असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.
पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे ….आपले केंद्र सरकार काय देणार …अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही … बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून @Dev_Fadnavis https://t.co/QH60dZJHLn
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2021
‘मास्क न लावण्यात काय शौर्य आहे?’
ADVERTISEMENT
दरम्यान आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समाचार घेतला. ‘अनेक जणांना वाटतं की मास्क का लावतोय तू? मास्क न लावण्यात काय शौर्य आहे? मी मास्क वापरत नाही, मी मास्क वापरणार नाही… काय शूर आहेस? मास्क न वापरणं या शूरता नाही. मास्क लावायला लाजण्याची गरज नाहीए. परत एकदा सांगतो लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क लावायलाच पाहिजे.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
त्यांना माझा नमस्कार आहे ! उद्धव ठाकरे राजना असं का म्हणाले??
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT