Mansukh ने आत्महत्या केली असावी ! Sachin Vaze कडून वरिष्ठांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानीच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने कोर्टात आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर यायला लागल्या आहेत. हिरेनच्या हत्येचा कट सचिन वाझे आणि इतर आरोपींनी कसा रचला याची माहिती या आरोपपत्रात NIA ने दिली आहे. याचसोबत सुरुवातीला स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सचिन वाझेने आपल्या वरिष्ठांची […]
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानीच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने कोर्टात आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर यायला लागल्या आहेत. हिरेनच्या हत्येचा कट सचिन वाझे आणि इतर आरोपींनी कसा रचला याची माहिती या आरोपपत्रात NIA ने दिली आहे. याचसोबत सुरुवातीला स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सचिन वाझेने आपल्या वरिष्ठांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT
या प्रकरणाता तपास करणाऱ्या ACP अधिकाऱ्याने NIA ला यासंबंधीची माहिती दिली आहे. सचिन वाझेने अँटेलिया आणि हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासात इतर कोणत्याही सहकाऱ्यांना सहभागी होऊ दिलं नसल्याचंही या अधिकाऱ्याने NIA ला सांगितलं.
२६ ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात सचिन वाझे स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत होता. यानंतर हे प्रकरण ACP दराच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आलं, १ मार्च रोजी या अधिकाऱ्याने या प्रकरणाच्या तपासाची सूत्र आपल्या हाती घेतली. ६ मार्चपर्यंत या अधिकाऱ्याने या प्रकरणाचा तपास केला, ज्यानंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिरेनच्या हत्येचा तपास ATS कडे सोपवला.
हे वाचलं का?
….म्हणून Sachin Vaze ने Mansukh Hiren च्या हत्येचा कट रचला, नंतर स्वतःला वाचवण्याचाही केला प्रयत्न
या प्रकरणातली CCTV फुटेज ही मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडे होती. २५ फेब्रुवारीच्या दिवशी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाची टोयोटा कार दोनवेळा दिसली पण ती देखील वेगळ्या नंबरप्लेटसोबत. दोन्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या या कारचं नीट निरीक्षण केल्यानंतर पोलिसांना ही कार एकच असल्याचं जाणवलं परंतू गाडीत बसलेला व्यक्ती आणि स्टिकर हे वेगळे होते. ACP अधिकाऱ्याने ही बाब सचिन वाझेला सांगितल्यानंतर वाझेने त्या अधिकाऱ्याला, तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग माहिती मीडियाला लिक होत असल्याबद्दल नाराज आहेत. त्यामुळे CIU च्या अधिकाऱ्यांव्यतिरीक्त इतर जे कोणी अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत त्यांनी हा तपास थांबवावा असे आदेश परमबीर यांनी दिल्याचं सचिन वाझेने ACP अधिकाऱ्याला सांगितलं.
ADVERTISEMENT
यानंतर तत्कालीन पोलीस सह आयुक्ती (गुन्हे) मिलींद भारंबे यांच्याकडून ACP अधिकाऱ्याला या तपासातून मागे येण्याचे आदेश आले आणि या प्रकरणाचा तपास CIU चे प्रमुख सचिन वाझे व त्यांचे सहकारी रियाझ काझी आणि होवळ यांच्याकडे आला.
ADVERTISEMENT
एका क्षणाला सचिन वाझेने ACP अधिकाऱ्याला अँटेलिया बाहेरील स्कॉर्पिओ प्रकरण हे फुटकळ असून यावर तपासात आपला वेळ वाया घालवला जाऊ नये असं सह पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांचं मत असल्याचं सांगितलं. ज्या क्षणी ACP अधिकाऱ्याकडे याचा तपास आला त्यावेळी त्यांना कोणत्याही सहकाऱ्याची मदत नव्हती ज्यामुळे त्यांना माहितीसाठी सचिन वाझे आणि त्यांच्या सहकार्यांवर अवलंबून रहावं लागलं.
Antilia Bomb प्रकरण : सचिन वाझेला मुकेश अंबानींकडून उकळायचे होते पैसे -NIA
या प्रकरणातील मुख्य साक्षीदार मनसुख हिरेनची स्कॉर्पिओ प्रकरणात आपण चौकशी केल्याचं ACP अधिकाऱ्याने NIA ला सांगितलं. परंतू त्यावेळीही सचिन वाझेने मला या प्रकरणात काहीही दम नसल्याचं सांगितलं. मनसुख हिरेनची चौकशी होत असताना एकदा एक व्यक्ती केबिन मध्ये आला आणि त्याने वाझेच्या हातात काही मोबाईल दिले. त्या व्यक्तीने हे मोबाईल Without IMEI नंबर असल्याचं सांगितलं. माझ्या उपस्थितीत वाझेने त्या व्यक्तीची हिरेनसोबत ओळख करुन दिली. NIA च्या माहितीनुसार याच फोनवरुन नंतर हिरेनच्या हत्येचा कट रचला गेला.
५ मार्चला मनसुख हिरेनचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला. त्याआधी एक दिवस म्हणजेच ४ मार्चला ACP अधिकाऱ्याने वाझे आणि त्यांची टीम नेमकी कुठे आहे हे तपासलं परंतू त्यावेळी त्याला वाझे आणि सहकारी अँटेलिया प्रकरणाच्या तपासासाठी गेल्याचं समजलं. ५ मार्चला ज्यावेळी ACP अधिकारी आणि सचिन वाझेची भेट झाली. त्यावेळी सचिन वाझेला मनसुख हिरेनचा मृतदेह सापडल्याचा फोन आला. ही बातमी समजताच ACP अधिकाऱ्याला धक्का बसला. त्याने याविषयी वाझेला विचारलं असता वाझेने त्याला, मनसुखने मानसिक दबावामुळे स्वतःला संपवलं असेल असं उत्तर दिलं. यानंतर सचिन वाझे काही लोकांसबत पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटायला गेल्याचं ACP अधिकाऱ्याने सांगितलं.
ज्यावेळी वाझे आणि इतर लोकं सिंग यांना भेटाय़ला गेले त्यावेळी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माही तिकडेच होता. या प्रकरणात NIA ने प्रदीप शर्मालाही अटक केली आहे. मनसुखच्या मृतदेहावर पोस्टमार्टम सुरु होण्याआधी डॉक्टरांनी सचिन वाझेला मनसुखच्या चेहऱ्यावर एक मास्क असून चेहऱ्यावर, मानेवर आणि शरिरावर कोणत्याही जखमा नसल्याचं सांगितलं. मनसुखचे हातही बांधलेले नव्हते ज्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी असा अदांज डॉक्टरांनी व्यक्त केला.
Antilia Case : धुळीने माखलेल्या Scorpio च्या नव्या Number Plate कडे रिलायन्सच्या सुरक्षा प्रमुखाचं लक्ष गेलं अन..
हिरेनच्या हत्येची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे आणि इतर अधिकऱ्यांना आपल्या वर्षा बंगल्यावर बोलावून घेतलं. अँटेलिया प्रकरण अतिरेक्यांशी संबंध आहे का असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरेंनी विचारला. यावेळी सचिन वाझेने मुख्यमंत्र्यांना अँटेलिया प्रकरणाचा दहशतवादाशी काहीही संबंध नसून मनसुखचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचं प्राथमिक तपासात कळल्याचं सांगितलं. परंतू त्यावेळचे ATS प्रमुख जगजित सिंग यांनी अँटेलिया प्रकरणात Terror Angle असण्याची शक्यता वर्तवली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT