आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही, Congress नेत्याने सुनावलं
राज्यातीस महाविकास आघाडी सरकारमधील सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षाची सरकारमधे होत असलेली धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची घुसमट होत असल्याची भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी बोलून दाखवली. ते सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस पक्षातील ओबीसी नेते स्वतंत्र असून काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर […]
ADVERTISEMENT
राज्यातीस महाविकास आघाडी सरकारमधील सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षाची सरकारमधे होत असलेली धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची घुसमट होत असल्याची भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी बोलून दाखवली. ते सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस पक्षातील ओबीसी नेते स्वतंत्र असून काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही असं म्हणत, माळी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलाच टोला लागला. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे तर राष्ट्रवादी हा फक्त ९ जिल्ह्यांपुरता पक्ष असल्याचंही माळी म्हणाले. काँग्रेसच्या मदतीने राज्यातलं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. परंतू शिवसेना-राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसला मंत्रीपद कमी मिळाली. दोन्ही पक्षांच्या तुलनेत काँग्रेसला निधी देखील कमी मिळत असल्याचा आरोप माळी यांनी केला.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची घुसमट होती आहे का ? असा सवाल उपस्थित करताच , माळी यांनी होय असं उत्तर दिलं. “महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमची घुसमट होत आहे.” शिवाय ही घुसमट नेत्यांचीच नव्हे तर, काँग्रेस पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची देखील घुसमट होत असल्याची कबुली माळी त्यांनी यावेळी दिली. यावेळी बोलत असताना माळी यांनी ओबीसी आरक्षणावरुन भाजपलाही खडे बोल सुनावले.
हे वाचलं का?
भाजप सरकारनेच जाणीव पूर्वक ओबीसींचा इम्पेरिकेल डेटा सर्वोच्च न्यायालयाला दिला नसल्यानं न्यायालयाला ओबीसींचा राजकीय आरक्षणला स्थगिती द्यावी लागली. ओबीसी आरक्षण हे ओबीसींच्या हक्काचं असून हे आरक्षण कुणालाही हिरावून घेण्याचा अधिकार नाही असंही भानुदास माळी म्हणाले. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्वबळाचा नारा दिला होता. यानंतर काँग्रेसमधील आणखी एका नेत्याने सरकारमधे होत असलेली घुसमट बोलून दाखवली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT