आम्ही तर मोदींचे शिष्य! Nawab Malik असं का म्हणाले? जाणून घ्या…
गेल्या काही दिवसांपासून NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत नवाब मलिकांनी आरोपांची राळ उडवली होती. यानंतर मलिकांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री राष्ट्रवादी पक्षाचेच असताना सोशल मीडियावर ही बाब का समोर आणत आहात, तक्रार करा, असा […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत नवाब मलिकांनी आरोपांची राळ उडवली होती. यानंतर मलिकांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री राष्ट्रवादी पक्षाचेच असताना सोशल मीडियावर ही बाब का समोर आणत आहात, तक्रार करा, असा टोला लगावला. अतुल भातखळकरांच्या या टीकेलाही नवाब मलिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय होतं नवाब मलिकांचं ट्विट –
मलिक यांनी शुक्रवारी संध्याकाळी एक ट्विट करत एका कारमधील काही लोक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घराच्या आणि शाळेच्या आसपास फिरून रेकी करत असल्याचा दावा केला आहे. तसेच, या फोटोतील लोकांना आपली काही माहिती हवी असल्यास थेट मला भेटा, मी त्यांना माहिती देईन, असं देखील नवाब मलिक यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
यह लोग इस गाड़ी में सवार पिछले कुछ दिनों से मेरे घर और स्कूल की 'रेकी' कर रहे हैं.
अगर कोई इन्हें पहचानता हो तो मुझे जानकारी दे.
जो लोग इस तस्वीर में हैं, मेरा उनसे कहना हैं कि, तुम्हें मेरी कोई जानकारी चाहिए तो आकार मुझसे मिले, मैं सारी जानकारी दे दूँगा pic.twitter.com/ZAmJhqEWoL— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2021
भातखळकरांचा प्रतिप्रश्न –









