Devendra Fadnavis: “राहुल गांधींना वीर सावरकर यांच्याविषयीचा ‘स’ देखील ठाऊक नाही”
राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्याविषयीचा स देखील माहित नाही. काही लोक त्यांना भाषण लिहून देतात आणि ते भाषण करतात त्याला काय अर्थ आहे? असा प्रश्न विचारत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आज उपमुख्यमंत्री […]
ADVERTISEMENT

राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्याविषयीचा स देखील माहित नाही. काही लोक त्यांना भाषण लिहून देतात आणि ते भाषण करतात त्याला काय अर्थ आहे? असा प्रश्न विचारत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.
वीर सावरकरांसारखा मला एक नेता दाखवा ज्याने ११ वर्षे अत्याचार सहन केले
काँग्रेसच्या नेत्यांनीही स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं. मला सगळ्या नेत्यांविषयी आदर आहे. मात्र माझा एकच सवाल आहे की ज्याप्रमाणे अंदमान कालकोठडीत वीर सावरकर यांनी दुहेरी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. ११ वर्षे अत्याचार सहन केले असा एक नेता मला दाखवा. त्यातही असे अत्याचर सहन करत असताना त्यांच्या मनात स्वातंत्र्यलक्ष्मीचं पूजा होती. तेच गीत त्यांनी त्या ठिकाणी केला. स्वातंत्र्यवीर सावरकर त्या कारागृहात गेले नसते तर तिथल्या कैद्यांना हिंमत ही वीर सावरकरांनी दिली.
राहुल गांधींना काय ठाऊक आहे वीर सावरकरांबाबत?
राहुल गांधी जे काही बोलतात ते त्यांना कुणीतरी लिहून देतं. राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्याविषयीचा स देखील माहित नाही. लिहिलेलं वाचून दाखवतात. या वेड्यांना हे देखील माहित नाही की वीर सावरकर किती वर्षे तुरुंगात होते. यांना उत्तर दिलंच पाहिजे. ते उत्तर आपण देऊ हा विश्वास मी व्यक्त करतो. वीर सावरकर ते बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंतचा जो हिंदुत्वाचा विचार आहे तो महत्त्वाचा आहे. वीर सावरकरांना हे माहित होतं की हा देश तोपर्यंत दुर्बल राहिल जोपर्यंत इथला हिंदू समाज एकत्र येत नाही. हिंदू समाज हा देशाचा आत्मा आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठाऊक होतं.
वीर सावरकर सांगत होते की मला लक्षात ठेवायचं असेल तर जाती व्यवस्थेच्या विरूद्ध दिलेला लढा, अस्पृश्यता निवारणाचे प्रयत्न आणि हिंदू समाजाला एकवटण्याचे केलेले प्रयत्न यासाठी मला लक्षात ठेवा. जाती व्यवस्थेच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लढा उभा केला. बाळासाहेब ठाकरे यांनी जात हे शस्त्र कधीही राजकारणात वापरलं नाही. वीर सावरकरांच्या विचारांचा धागा बाळासाहेबांनी पुढे नेला.
वीर सावरकरांना शिव्या घालणाऱ्यांना जवळ करणाऱ्यांना बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा अधिकार काय?
हिंगोलीत वीर सावरकरांविषयी राहुल गांधी एवढं नीच वक्तव्य करतात. त्याच राहुल गांधींसोबत गळ्यात गळे घालून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात हे चित्र पाहून आमचं जाऊदे किमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील ? वीर सावरकरांचा जाज्वल्य अभिमान बाळासाहेब ठाकरेंना होता. त्यांचे विचार बाळासाहेब ठाकरेंनी पुढे नेले. मात्र आताचं चित्र पाहिलं तर वाईट वाटतं असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करणार असाल तर बाळासाहेब ठाकरेंशी नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार काय? त्यामुळेच इथे बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली आहे. एकनाथ शिंदे हे रक्ताच्या नात्याने बाळासाहेबांचे काहीही लागत नसतील पण बाळासाहेबांचा विचार ते पुढे घेऊन जात आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
वीर सावरकर यांच्याबाबत काय म्हणाले होते राहुल गांधी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत हे कुठेही दिसले नाहीत. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात लढा दिला. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत. हे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. आज देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.