Salman Khan : गँगस्टरकडून जीवे मारण्याची धमकी, सलमानचं काय आहे म्हणणं?
Salman khan Threatens : सलमान खानला अलीकडेच ई-मेलद्वारे धमकी आली होती. यानंतर त्याच्या घराबाहेरील (Security ) सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली होती. पण त्याच्या जवळच्यांच्या म्हणण्यानुसार सलमानला धमक्यांनी काही फरक पडत नाही. त्याला मुक्तपणे आयुष्य जगायला आवडते. 2019 मध्येही त्याला (Lawrence Bishnoi ) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्याच वेळी अलीकडेच त्याच्या […]
ADVERTISEMENT
Salman khan Threatens : सलमान खानला अलीकडेच ई-मेलद्वारे धमकी आली होती. यानंतर त्याच्या घराबाहेरील (Security ) सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली होती. पण त्याच्या जवळच्यांच्या म्हणण्यानुसार सलमानला धमक्यांनी काही फरक पडत नाही. त्याला मुक्तपणे आयुष्य जगायला आवडते. 2019 मध्येही त्याला (Lawrence Bishnoi ) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्याच वेळी अलीकडेच त्याच्या (Maneger) मॅनेजरला एक ई-मेल आला, ज्यामध्ये त्याला गँगस्टर गोल्डी ब्रारशी बोलण्यास सांगितले होते. What does Salman Khan have to say about the gangster threat?
ADVERTISEMENT
जर सलमान बोलला नाही तर मोठा धक्का दिला जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. मॅनेजरने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.
Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय?
हे वाचलं का?
सलमानला सुरक्षा नकोय
TOI च्या रिपोर्टनुसार, सलमानच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, या गोष्टी अभिनेत्याला त्रास देत नाहीत.-“सलमान ही धमकी अगदी सामान्य पद्धतीने घेत आहे. किंवा कदाचित त्याच्या आई-वडिलांना त्रास होऊ नये म्हणून अभिनय करत आहे. ‘हम साथ साथ हैं’ पद्धतीने जगणाऱ्या या कुटुंबाची खास गोष्ट म्हणजे ही भीती त्यांच्या चेहऱ्यावर कोणीही येऊ देत नाही. सलमानचे वडील सलीम खानही खूप शांत दिसत आहेत. पण सलीम खान यांना रात्री झोप येत नाही हे संपूर्ण कुटुंबाला माहीत आहे, असं सलमानच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं.
ADVERTISEMENT
Salman Khan: अंबानींच्या अँटेलियामध्ये सलमान खान कोणासोबत पोहचला, ‘ती’ मुलगी कोण?
ADVERTISEMENT
वेळेवर रिलीज होणार चित्रपट
सलमान या कडक सुरक्षेच्या विरोधात होता. त्याच्या जवळचा व्यक्तीने सांगितले की- “सलमानला वाटतं की असं करून तुम्ही त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीला जास्त महत्व देत आहात. भीतीपोटी तुम्ही जितके सुरक्षा वाढवाल तितका तो त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होईल. याशिवाय सलमान नेहमीच मोकळेपणाने जगण्यावर विश्वास ठेवतो. तो म्हणतो, जेव्हा जे व्हायचे असते तेव्हा ते होईल. मात्र कौटुंबिक दबावामुळे त्याने आपल्या सर्व आऊटडोर प्लॅन्सला फाटा दिला आहे. पण ईदला रिलीज होणाऱ्या ‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अशी देखील माहिती दिली.
‘प्रकरण बंद करायचं असेल तर…’ सलमान खानला घातपाताची पुन्हा धमकी!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT