नाहीतर हजारो लोक रस्त्यावर मरतील, पाहा यशोमती ठाकूर काय म्हणाल्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावती: अनलॉकनंतर पहिल्यांदाच पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा अमरावतीमध्ये करण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या घोषणामुळे अमरावतीकरांना आता पुढील सात दिवस तरी घरीच थांबावं लागणार आहे. जर लोकांनी नियम पाळले नाहीत तर कोरोनाच रुग्ण वाढतील आणि त्यानंतर हजारो लोक रस्त्यावर मरतील. त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं देखील अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. यावेळी हा लॉकडाऊन कशा स्वरुपाचा असणार आहे याबाबत यशोमती ठाकूर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

पाहा लॉकडाऊनबाबत नेमकं काय-काय म्हणाल्या यशोमती ठाकूर

अमरावतीमधील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे येथील नागरिक मात्र बेफिकीरपणे मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता सार्वजनिक स्थळी फिरत असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत एक आठवड्याचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत यशोमती ठाकूर यांनी नेमकी काय माहिती दिली हे जाणून घ्या

‘आज आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागत आहे. उद्या (22 फेब्रुवारी) रात्री 8 वाजेपासून हा लॉकडाऊन लागू होणार आहे. कारण आता तेवढा एकच पर्याय आमच्याकडे शिल्लक राहिला आहे. साधारण सात दिवसासाठी हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तू आणि एमआयडीसी सुरु राहणार आहेत. याव्यतिरिक्त सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. अमरावती शहर आणि अचलपूर हे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. सध्या प्रशासनाला कठोर राहावं लागणार आहे कारण त्याशिवाय पर्याय नाही.’

हे वाचलं का?

‘आपण अगदी तडकाफडकी लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. कारण आपल्या हातात आणखी उद्या रात्री 8 वाजेपर्यंत वेळ असणार आहे. पण त्यानंतर मात्र, प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. लोकांनी काही काळ आपलं लग्नकार्य आणि समारंभ पुढे ढकलणं गरजेचं आहे. आजही लोकं मास्क न घालता रस्त्यावर फिरत आहेत जर लोकांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि लोकं रस्त्यावर मरतील.’

‘सध्या प्रशासनाला कठोर लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे आम्ही टेस्ट देखील वाढवित आहोत. जर पुढच्या सात दिवसात देखील नागरिकांन कोरोनाबाबतचे नियम पाळली नाही तर लॉकडाऊन अधिक कठोर करावा लागेल. सध्या आपल्याकडे 1400 बेड आहेत. तसेच आणखी 200 बेड तयार करण्याचं काम सुरु आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रशासन सज्ज आहे. मात्र, लोकांनी काळजी घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे.’ असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT