क्रूझ पार्टीची टीप कुणी दिली होती? काय घडलं? सुनील पाटील यांनी दिलं उत्तर…
मुंबईतल्या कॉर्डिलिया क्रूझ पार्टीचं प्रकरण गेल्या महिन्याभरापासून गाजतं आहे. या प्रकरणात 24 ऑक्टोबरपासून ट्विस्ट येत आहेत. कारण 24 तारखेला प्रभाकर साईल मीडियसमोर आला. तो या प्रकरणातला मुख्य साक्षीदार आहे. त्याने हे सांगितलं की आर्यन खानला सोडण्याच्या बदल्यात के.पी. गोसावीने 25 कोटी रूपये मागितले होते. त्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना द्यायचे होते. या आरोपामुळे एकच खळबळ […]
ADVERTISEMENT

मुंबईतल्या कॉर्डिलिया क्रूझ पार्टीचं प्रकरण गेल्या महिन्याभरापासून गाजतं आहे. या प्रकरणात 24 ऑक्टोबरपासून ट्विस्ट येत आहेत. कारण 24 तारखेला प्रभाकर साईल मीडियसमोर आला. तो या प्रकरणातला मुख्य साक्षीदार आहे. त्याने हे सांगितलं की आर्यन खानला सोडण्याच्या बदल्यात के.पी. गोसावीने 25 कोटी रूपये मागितले होते. त्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना द्यायचे होते. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली.
दरम्यान 6 ऑक्टोबरपासून नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन हे सांगत आहेत की एनसीबीने केलेली कारवाई बनावट आहे. शनिवारी म्हणजेच 6 नोव्हेंबरला मोहित कंबोजने त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत असाही आरोप मोहित कंबोजने केला होता. आता या प्रकरणी सुनील पाटील समोर आले आहेत. त्यांनी सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आहे.
सुनील पाटील तुम्ही मास्टरमाईंड आहात का? आणि क्रूझ पार्टीची टीप कुणी दिली?
सुनील पाटील-मी या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही, क्रूझ पार्टीची टीप मनिष भानुशालींकडे आली होती. नीरज यादव हे भाजपचे नेते आहेत. ते कैलाश विजयवर्गीय यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मला फोन केला होता. त्यावेळी मी आणि मनिष अहमदाबादला होतो. त्यावेळी कॉर्डिलियाला मोठी पार्टी होणार आहे आणि छापा पडणार आहे असं सांगण्यात आलं आहे. मी त्या पार्टीत सहभागी व्हायला नकार दिला. के. पी. गोसावीही तेव्हा दुसऱ्या हॉटेलवर थांबला होता.