Amruta Fadnavis : 1 कोटी लाचेची ऑफर देणारी डिझायनर अनिक्षा कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Amruta Fadnavis latest News :

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपये लाचेची ऑफर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सट्टेबाजांकडून पैसे उकळण्याचा प्लॅन सांगून एका कथित डिझायनर महिलेने अमृता फडणवीस यांना 1 कोटींची ऑफर दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे ही नेमकी तरुणी कोण आहे? ती अमृता फडणवीस यांना कशी भेटली? आणि केवळ पैसे उकळण्याचा प्लॅन होता का? असे सवाल विचारला जात आहे. (1 crore bribe offer to Amruta Fadnavis, Daughter of top bookie posed as designer)

नेमकी कोण आहे ही तरुणी?

अमृता फडणवीस यांना लाचेची ऑफर देणाऱ्या तरुणीचं नाव ‘अनिक्षा जयसिंघानी’ असं आहे. ती वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिक्षा ‘लॉ’ची पदवीधर आहे. तसंच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरची रहिवासी आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, वडिलांना वाचविण्यासाठीच अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क साधला अशी माहिती समोर येत आहे. अनिल जयसिंघानीवर महाराष्ट्र, गोवा, आसाममध्ये विविध ठिकाणी सरकारी अधिकार्‍यांना धमकावणे, फसवणूक करणे आणि दिशाभूल करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार त्यांना अनेक वेळा भेट दिली आणि त्यानंतर पळून गेलेल्या आणि पोलिस अधिकार्‍यांपासून लपून बसलेल्या तिच्या वडिलांविरुद्धचे पोलीस खटले बंद करण्यासाठी 1 कोटींची लाच देण्याची ऑफर दिली.

सट्टेबाजांशी डीलचा प्लान, 1 कोटींची ऑफर, अमृता फडणवीसांनी सांगितलं सगळं प्रकरण

ADVERTISEMENT

अमर जाधव – अनिल जयसिंघानी प्रकरण :

जयसिंघानी यांचे नाव मुंबई क्राइम ब्रँचचे माजी उपायुक्त अमर जाधव यांच्यावरील आरोपांमुळे प्रकाशझोतात आलं होतं. सुमारे दीड दशकांपूर्वी जाधव यांनी अनिल जयसिंघानी यांना क्रिकेट सामन्यांदरम्यान सट्टेबाजी करण्यास भाग पाडलं होतं आणि कथितपणे त्यांच्या मुलांना आणि पत्नीला ओलिस ठेवलं होतं, असा आरोप केला होता. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एव्हियन हॉटेलमध्ये तीन दिवस बेटिंग करण्यास सांगितलं होतं, असा दावा जयसिंघानी यांनी केला होता.

ADVERTISEMENT

अमृता फडणवीसांना 1 कोटी लाचेची ऑफर; मुंबईतील डिझायनरवर गुन्हा, प्रकरण काय?

पुढे त्यांच्या नातेवाईकांनी तत्कालीन अमर जाधव यांना 1 कोटी रुपये दिले तेव्हाच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जाण्याची परवानगी देण्यात आली असा मोठा आरोपही यावेळी जयसिंघानी यांनी केला होता. यानंतर जयसिंघानी यांचा जबाबही गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नोंदवला होता. पुढे जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलं होतं. पुढे काही वर्षांनी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पोलीस विभागाला रामराम केलं. परंतु जाधव यांच्यावरील आरोपांचे काय झाले हे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT