फेसबुक वापरता? मग आधी ‘हे’ काम करा, नाहीतर अकाऊंट होईल लॉक
तुमचं फेसबुक या लोकप्रिय सोशल मीडियावर अकाऊंट असेल आणि तुम्हाला फेसबुकच्या नवीन फिचरबद्दलची कल्पना नसेल, तर लवकर हे फीचर ऑन करा आणि अकाऊंट लॉक होण्याचा त्रास टाळा. फेसबुकने अनेक अकाऊंट लॉक केले असून, फेसबुक प्रोटेक्ट हे फीचर ऑन नसल्यामुळे हे करण्यात आलं आहे. या महिन्याच्या सुरूवातील फेसबुककडून या फीचरबद्दलची माहिती त्यांच्या यूजर्संना मेलद्वारे देण्यात आलेली […]
ADVERTISEMENT
तुमचं फेसबुक या लोकप्रिय सोशल मीडियावर अकाऊंट असेल आणि तुम्हाला फेसबुकच्या नवीन फिचरबद्दलची कल्पना नसेल, तर लवकर हे फीचर ऑन करा आणि अकाऊंट लॉक होण्याचा त्रास टाळा. फेसबुकने अनेक अकाऊंट लॉक केले असून, फेसबुक प्रोटेक्ट हे फीचर ऑन नसल्यामुळे हे करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
या महिन्याच्या सुरूवातील फेसबुककडून या फीचरबद्दलची माहिती त्यांच्या यूजर्संना मेलद्वारे देण्यात आलेली आहे. द व्हर्ज (the verge) च्या एका रिपोर्टनुसार फेसबुक प्रोटेक्ट (facebook protect) ऑन करण्यासाठी कंपनीकडून मेल पाठवण्यात आला आहे.
यामध्ये फेसबुक प्रोटेक्ट फीचर ऑन केलं नाही, तर अकाऊंट लॉक केलं जाईल, असं म्हटलेलं आहे. रिपोर्टनुसार हा ईमेल security@facebookmail.com या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेकांच्या स्पॅम फोल्डरमध्ये हा मेल गेला आहे.
हे वाचलं का?
ज्या व्यक्तींना हा मेल मिळाला, पण त्यांनी फेसबुक प्रोटेक्ट ऑन केलं नाही. त्यांचं अकाऊंट कंपनीकडून लॉक करण्यात आलं आहे. लॉगिन करताना अशा व्यक्तींना यासंदर्भातील मेसेज दिला आहे. त्याचबरोबर प्रक्रियेबद्दल सांगितलं जात आहे. १७ मार्चपर्यंत फेसबुक प्रोटेक्ट ऑन करण्याची शेवटची तारीख होती. दरम्यान, ज्यांनी ऑन केलं, तरीही काहीजणांचं अकाऊंट लॉक झाल्याचंही समोर आलं आहे.
अनेक यूजर्संनी ट्विटरवरून स्क्रीनशॉट शेअर करत याबद्दल म्हणणं मांडलं आहे. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड फोनवर मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली जात आहे. हाय रिस्क असणाऱ्या यूजर्संनी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन करून घेण्याची सूचना मेटाने गेल्यावर्षी म्हणजेच डिसेंबरमध्ये केली होती.
ADVERTISEMENT
Anyone else having major issues with Facebook protect? Completely locked out of my account. Then running into glitches and tech issues when trying to fix the problem ????
— Simone De Alba (@Simone_DeAlba) March 18, 2022
फेसबुक प्रोटेक्ट (facebook protect) ऑन कसं करायचं?
ADVERTISEMENT
सायबर क्राईम करणाऱ्यांकडून हाय रिस्क अकाऊंटना लक्ष्य केलं जातं आहे. त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे फिचर असून, त्यासाठी तुम्हाला फेसबुक प्रोटेक्ट ऑन करावं लागेल. यासाठी सेंटिग्ज अॅण्ड प्रायव्हसी सेक्शनमध्ये जाऊन सिक्युरिटी अॅण्ड लॉगिनवर क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर फेसबुक प्रोटेक्ट मध्ये जाऊन गेट स्टार्टेड (get started) ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फेसबुककडून अकाऊंटमधील उणीवा शोधल्या जातील आणि त्याआधारे तुम्हाला काही सूचना केल्या जातील. हे झाल्यानंतर फेसबुक प्रोटेक्ट ऑन करण्यासाठी सांगितलं जाईल. त्यानंतर तुम्ही दिलेल्या सूचनांचं पालन करून फेसबुक प्रोटेक्ट ऑन करू शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT