Petrol-Diesel Price Today: मोदी सरकार करतंय तरी काय?, 12 दिवसात पेट्रोल-डिझेल 8.40 रुपयांनी महागलं
IOCL, Petrol-Diesel Price Today 4 April 2022: देशातील मोदी सरकार नेमकं करतंय तरी काय? असा सवाल आता सामान्य जनता विचारु लागली आहे. कारण गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर, दूध आणि भाजीपाला यासह दैनंदिन वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 100 डॉलरच्या (Crude Oil Price) जवळपास पोहोचली असली तरी, […]
ADVERTISEMENT

IOCL, Petrol-Diesel Price Today 4 April 2022: देशातील मोदी सरकार नेमकं करतंय तरी काय? असा सवाल आता सामान्य जनता विचारु लागली आहे. कारण गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर, दूध आणि भाजीपाला यासह दैनंदिन वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 100 डॉलरच्या (Crude Oil Price) जवळपास पोहोचली असली तरी, भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात वाढ होण्याचा ट्रेंड कायम आहे.
आज (सोमवार) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत आज म्हणजेच 4 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 40-40 पैशांनी वाढ झाली आहे. यासह दिल्लीत आता पेट्रोल 103.81 रुपये आणि डिझेल 95.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
22 मार्चपासून पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची प्रक्रिया 22 मार्चपासून सुरू झाली. या दरम्यान 24 मार्च आणि 01 एप्रिल वगळता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ झाली आहे. मागील 14 दिवसांत तब्बल 12 वेळा पेट्रोलच्या दरात अनुक्रमे 80, 80, 80, 80, 50, 30, 80, 80, 80, 80, 80 आणि 40 पैशांनी वाढ झाली आहे. अशाप्रकारे पेट्रोल तब्बल 8 रुपये 40 पैशांनी महागले आहे.