गणेश नाईकांवर महिलेनं आरोप केलेलं लिव्ह इनचं ‘ते’ प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी मुंबई: भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने नवी मुंबईच्या नेरुळ पोलिसात तक्रार दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने गणेश नाईकांवर असा आरोप केला आहे की, गेले अनेक वर्ष ते लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते. आणि त्यांना 15 वर्षाचा एक मुलगा देखील आहे.

ADVERTISEMENT

आपल्या मुलाला नाईकांच्या संपत्तीत अधिकार आणि त्यांचं नाव मिळावं अशी महिलेची मागणी आहे. याच मागणीमुळे गणेश नाईक हे आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

याप्रकरणी तक्रारदार महिलेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नवी मुंबई पोलिसांना पत्र लिहून स्वतःच्या आणि आपल्या 15 वर्षांच्या मुलाला सुरक्षा पुरविण्याची विनंती केली आहे.

हे वाचलं का?

नवी मुंबईतील दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे गणेश नाईक यांचे राजकीय सुरुवात शिवसेनेतून झाली होती. पण नंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेदरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण 2019 साली त्यांनी राष्ट्रवादीचीही साथ सोडली आणि ते भाजपमध्ये सामील झाले. सध्या ते ऐरोली मतदारसंघाचे आमदार आहेत. पण आता गणेश नाईक यांच्यावर ज्या पद्धतीने महिलेने आरोप केले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत एकच खळबळ माजली आहे.

ADVERTISEMENT

यावेळी महिलेने ती गणेश नाईक यांची प्रेयसी असल्याचं म्हटलं आहे. तसं तिने आपल्या लेखी तक्रारीत देखील म्हटलं आहे. तिचा असा दावा आहे की, ती 1993 पासून गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये (live-in-relationship) होतो.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला ही देखील नवी मुंबईतीलच रहिवासी आहे. या तक्रारदार महिलेने तक्रारीत असं नमूद केलं आहे की, गणेश नाईक हे उच्चपदस्थ असल्यामुळे तिला तिच्या जीवाची भीती वाटत आहे. पण आपल्या मुलाच्या हक्कासाठी तिने सत्य समाजासमोर यावं यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं आहे.

गणेश नाईक हे आमच्या मुलाचे बायोलॉजिकल पिता आहेत. असा दावा महिलेने केला आहे. नाईकच्या मालमत्तेमध्ये माझ्या मुलाचा त्याच्या नावासह हक्क हवा आहे. अशी मागणी यावेळी महिलेने केली आहे.

दरम्यान, आता याप्रकरणी शिवसेनेची महिला आघाडी पुढे सरसावली आहे. गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी महिला आघाडीने दिला.

पुणे: लटकला ना भाऊ… पत्नीचं आधारकार्ड दाखवत गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये चेक-इन, अन्…

या आंदोलनात उपजिल्हासंघटक वैशाली घोरपडे, उषा रेणके, मथुरा पाटील, शहर संघटक कोमल वास्कर, शीतल कचरे, नगरसेविका भारती कोळी, शशिकला औटी, निता ढमामे, भाग्यश्री पिसाळ, विद्या भोईर, आरती आचरे, गीता पाटील, मधुमती हरमळकर, संगीता पाटील, अपर्णा दुरापे यांच्यासह शेकडो महिला शिवसैनिक सहभागी झाल्या होत्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT