मोदी सरकारच्या निर्णयानंतर तुमच्या शहरात पेट्रोलचा नेमका भाव काय?, आजपासून किती रुपयांना मिळणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) जनतेला दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर एक गिफ्ट दिलं आहे. मागील काही दिवसापासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर हे प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकाराने आता पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात ताबडतोब कपात केली आहे. त्यामुळे दिवाळीत सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ADVERTISEMENT

सरकारने घेतलेला हा निर्णय आजपासून (4 नोव्हेंबर) संपूर्ण देशात लागू होणार आहे. यावेळी पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क 5 रूपये तर डिझेलवरचं उत्पादन शुल्क 10 रूपयांनी कमी करण्यात आलं आहे.

दरम्यान, असं असलं तरी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात पेट्रोलचे वेगवेगळे दर आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्या शहरात पेट्रोल किती दर आहेत आणि सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल किती स्वस्त होणार हे पाहूयात सविस्तरपणे.

हे वाचलं का?

पेट्रोलचे आजचे (४ नोव्हेंबर) दर

  • अहमदनगर – 110.80

ADVERTISEMENT

  • अकोला – 109.77

  • ADVERTISEMENT

  • अमरावती – 111.08

  • औरंगाबाद – 110.69

  • भंडारा – 110.53

  • बीड – 111.37

  • बुलढाणा – 111.51

  • चंद्रपूर – 110.11

  • धुळे – 110.46

  • गडचिरोली – 111.07

  • गोंदिया – 110.99

  • बृहन्मुंबई (ग्रेटर मुंबई) – 110.11

  • हिंगोली – 111.07

  • जळगाव – 110.34

  • जालना – 111.51

  • कोल्हापूर – 109.98

  • लातूर – 111.33

  • मुंबई – 109.98

  • नागपूर – 109.71

  • नांदेड – 112.41

  • नंदुरबार – 110.67

  • नाशिक – 110.71

  • उस्मानाबाद – 110.24

  • पालघर – 110.56

  • परभणी – 113.15

  • पुणे – 109.53

  • रायगड – 110.66

  • रत्नागिरी – 111.52

  • सांगली – 109.92

  • सातारा – 110.66

  • सिंधुदुर्ग – 111.20

  • सोलापूर – 110.57

  • ठाणे – 110.04

  • वर्धा – 110.12

  • वाशिम – 110.54

  • यवतमाळ – 111.52

  • मोदी सरकारचं जनतेला दिवाळी गिफ्ट! उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल-डिझेल उद्यापासून होणार स्वस्त

    हे पेट्रोलचे आजचे म्हणजेच 4 नोव्हेंबरचे दर आहेत. सरकारच्या निर्णयानंतर 5 रुपयांची कपात झाल्याने हे दर कमी झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारे पेट्रोलचे दर हे सामान्यांच्या आवाक्यापलिकडे चालले होते. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात नाराजी देखील वाढत चालली होती. अशावेळी आता केंद्राने ही नाराजी लक्षात घेऊन पेट्रोलचे दर काहीसे कमी करण्याचा प्रयत्न केला.

    दरम्यान, येत्या काही महिन्यातच काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील असणार आहेत. अशावेळी या सगळ्या गोष्टींचा विचार करुन मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मत अनेक जण व्यक्त करत आहेत. मात्र, असं असलं तरी यामुळे सामान्यांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT