नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नाराजीचं कारण काय? सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात काय?
पंजाबमध्ये राजकीय भूकंप काही थांबताना दिसत नाहीत. गेल्या आठवड्यात आपल्याला अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर चन्नी मुख्यमंत्री झाले त्या घडामोडी पाहण्यास मिळाल्या. आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाा आहे. सोनिया गांधींना पत्र पाठवून सिद्धू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप पाहण्यास मिळाला आहे. […]
ADVERTISEMENT
पंजाबमध्ये राजकीय भूकंप काही थांबताना दिसत नाहीत. गेल्या आठवड्यात आपल्याला अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर चन्नी मुख्यमंत्री झाले त्या घडामोडी पाहण्यास मिळाल्या. आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाा आहे. सोनिया गांधींना पत्र पाठवून सिद्धू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप पाहण्यास मिळाला आहे.
ADVERTISEMENT
सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात सिद्धू यांनी काय म्हटलं आहे?
तडजोड केल्याने माणसाचं चारित्र्य संपून जातं. मी पंजाबच्या भविष्यासोबत कुठलीही तडजोड करू इच्छित नाही. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्षपद सोडतो आहे, यापुढेही काँग्रेससाठी काम करत राहिन.
हे वाचलं का?
काय आहेत सिद्धू यांच्या नाराजीची कारणं?
ADVERTISEMENT
कॅबिनेटमध्ये ज्या प्रकारे मंत्रिमंडळांचं वाटप झालं त्यामुळे सिद्धू नाखुश होते
ADVERTISEMENT
नव्या कॅबिनेटमध्ये सुखविंदर रंधावा यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं आहे, मात्र सिद्धू आणि त्यांचे सहकारी हे कायमच त्यांचा विरोध दर्शवत होते
अमृतसर सुधार ट्रस्टचं पत्र चरणजीत चन्नी यांच्या द्वारे दिलं गेलं. हे पत्र सिद्धू यांना द्यायचं होतं
काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्याने सिद्धू खुश नव्हते.
सध्याच्या घडीला सिद्धू यांच्या नाराजीची चार कारणं सांगितली जात आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पदावरून हटवण्यासाठी सिद्धू यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला. तो दिल्यानंतर अर्थातच मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू झाली ती सिद्धू यांच्याच नावाची. पण सिद्धू यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आलं तर मी त्यांना विरोध दर्शवेन ते पाकिस्तानशी चांगले संबंध असलेले आहेत असं म्हणत राजीनामा दिलेल्या अमरिंदर यांनीच त्यांच्या नावाला विरोध दर्शवला. त्यानंतर चरणजीत चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री झाले. पंजाबमध्ये घडलेल्या एकापाठोपाठ एक घडामोडींमागे सिद्धू होतेच. पण नंतर जे काही घडत गेलं त्यातून त्यांची नाराजी वाढली. आता त्यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दिग्गजांना मागे सारलं, कोण आहेत चरणजीत सिंह चन्नी?
अमरिंदर सिंग यांची खोचक प्रतिक्रिया
सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची बातमी येताच पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
Former Punjab CM Captain Amarinder Singh tweets after the resignation of Navjot Singh Sidhu as Punjab Congress President; calls him “not a stable man” pic.twitter.com/GxoP2w4wVs
— ANI (@ANI) September 28, 2021
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT