भुमरे, गुलाबरावांकडे तीच खाती; भुसे, सत्तार, देसाईंची बदलली, शिंदे गटाला काय मिळालं?
शिंदे गटाचे प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे १४ खाती घेतली आहेत. सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ ही मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवली […]
ADVERTISEMENT

शिंदे गटाचे प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे १४ खाती घेतली आहेत. सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ ही मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवली आहेत.
संदिपान भुमरे यांना आताच्या मंत्रिमंडळात रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खातं मिळालं आहे, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे हेच खाते होते.