Mumbai: ‘मला गर्लफ्रेंडला भेटायचं आहे, कोणतं स्टिकर लावू?’, मुंबई पोलिसांनी पठ्ठ्याला दिलं भन्नाट उत्तर!
मुंबई: मुंबईत कोरोना व्हायरसचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. अशावेळी ही साखळी तोडण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुंबई पोलिसांनी देखील लोकांना अत्यावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडता येईल हे स्पष्ट केलं आहे. या सगळ्यामुळे सध्या सगळीकडेच एक प्रकारचं नकारात्मक वातावरण तयार झालं आहे. पण याचवेळी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना टॅग केलेलं […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुंबईत कोरोना व्हायरसचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. अशावेळी ही साखळी तोडण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुंबई पोलिसांनी देखील लोकांना अत्यावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडता येईल हे स्पष्ट केलं आहे. या सगळ्यामुळे सध्या सगळीकडेच एक प्रकारचं नकारात्मक वातावरण तयार झालं आहे. पण याचवेळी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना टॅग केलेलं ट्विट आणि त्याला त्यांनी दिलेलं उत्तर हे आपल्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलवेल.
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसाचे सोशल अकाउंट हे खूपच वेगळ्या पद्धतीने हँडल केलं जात असल्याची उदाहरण आपण आजवर अनेकदा पाहिली आहेत. आता देखील मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ट्विटरवरुन असं काही उत्तर दिलं आहे की, ज्यामुळे आपल्याला देखील हसू आवरणार नाही.
खरं तर मुंबई पोलिसांचीा सोशल मीडिया अकाउंट सांभाळणारी टीम ही खूपच तत्पर असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. मुंबई पोलिसांनी या माध्यमाचा वापर करुन अनेकांच्या अडचणी चुटकीसरशी सोडवल्या आहेत. पण थोड्या वेळापूर्वी एका व्यक्तीने जी अडचण मुंबई पोलिसांसमोर मांडली त्याल मुंबई पोलिसांनी अतिशय खेळकरपणे उत्तर दिलं आहे.
हे वाचलं का?
जबरदस्त… मुंबई पोलिसांच्या ‘या’ कामाला तोड नाही!
अश्विन विनोद नावाचं अकाउंट असलेल्या ट्विटर हँडलवरुन आज दुपारच्या सुमारास मुंबई पोलिसांना टॅग करुन एक ट्विट करण्यात आलं. ज्यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, ‘मला बाहेर जाऊन माझ्या गर्लफ्रेंडला भेटायचं आहे. मला तिची खूप आठवण येत आहे. मला जर तिला भेटायला जायचं असेल तर मी माझ्या गाडीवर कोणतं स्टिकर वापरु?’
ADVERTISEMENT
@MumbaiPolice what sticker should I use in order to go out and meet my girlfriend? I miss her?
— Ashwin Vinod (@AshwinVinod278) April 22, 2021
खरं तर मुंबई पोलीस या ट्विटकडे दुर्लक्ष करु शकले असतं. पण संबंधित व्यक्तीची तगमग पाहता मुंबई पोलिसांनी खास आपल्या शैलीत उत्तर देत त्या व्यक्तीच्या भावनांचा एक प्रकारे आदरच केला आहे. यावेळी मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘सर, आम्हाला माहिती आहे की, ही आपल्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. पण दुर्दैवाने ही गोष्ट आमच्या अत्यावश्यक किंवा आपत्कालीन श्रेणीमध्ये येत नाही. दुराव्याने प्रेम अधिक वाढतं आणि सध्या आपण स्वस्थ आहात. आपण दोघे आयुष्यभर एकत्र राहावे यासाठी आम्ही आपल्याला शुभेच्छा देत आहोत. खरं तरी ही फक्त एक फेझ (टप्पा) आहे.’ असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
We understand it’s essential for you sir but unfortunately it doesn’t fall under our essentials or emergency categories!
Distance makes the heart grow fonder & currently, you healthier
P.S. We wish you lifetime together. This is just a phase. #StayHomeStaySafe https://t.co/5221kRAmHp
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 22, 2021
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या या उत्तराचं अनेक ट्विटर यूजर्सने मनापासून कौतुक केलं आहे. मुंबई पोलिसांची सोशल मीडिया हँडल करणारी टीम ही चांगल्या पद्धतीने काम करत असल्याची पोच पावती देखील अनेकांनी यावेळी दिली आहे.
…म्हणून अभिषेक बच्चनच्या चित्रपटाचं शूटींग पोलिसांनी थांबवलं
सध्या सगळीकडेच एक प्रकारचं नकारात्मक वातावरण आहे. अनेक जण या नकारत्मकतेमुळे निराशेकडे झुकू लागले आहेत. पण अशा वातावरणातही आणि प्रचंड दबावाखाली असताना देखील मुंबई पोलीस आणि विशेषत: त्यांची सोशल मीडिया टीम ही लोकांना मदत तर करतेच आहे पण त्यांची निराशा कशी झटकता येईल आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसं फुलवता येईल याचीही ते काळजी घेत आहे. त्यामुळेच मुंबई पोलिसांच्या या कामला देखील ‘मुंबई तक’चा सलाम. (what sticker should i use in order to go out and meet my girlfriend see the answer given by mumbai police on twitter)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT