Mumbai Lockdown: मुंबईत कठोर लॉकडाऊन; पाहा काय सुरु, काय बंद
मुंबई: राज्यातील वाढती कोरोना (Corona) रुग्णांची संख्या लक्षात घेता सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. यावेळी मुंबईत (Mumbai) झपाट्याने रुग्ण वाढत असल्याने सरकारने येथील रुग्णसंख्या वेळीच आटोक्यात आणण्यासाठी आता अत्यंत कठोर नियम लागू केले आहेत. पण लॉकडाऊन असलं तरीही काही गोष्टी मात्र सुरु असणार आहेत. जाणून घ्या मुंबईत काय सुरु आणि काय बंद […]
ADVERTISEMENT

mumbaitak
मुंबई: राज्यातील वाढती कोरोना (Corona) रुग्णांची संख्या लक्षात घेता सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. यावेळी मुंबईत (Mumbai) झपाट्याने रुग्ण वाढत असल्याने सरकारने येथील रुग्णसंख्या वेळीच आटोक्यात आणण्यासाठी आता अत्यंत कठोर नियम लागू केले आहेत. पण लॉकडाऊन असलं तरीही काही गोष्टी मात्र सुरु असणार आहेत. जाणून घ्या मुंबईत काय सुरु आणि काय बंद असेल.
पाहा मुंबईत काय सुरु असेल:
-
लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आलेली आस्थापने ही सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंतच सुरु राहतील. वैद्यकीय सेवांशी संबंधित गोष्टी याला अपवाद असतील.
हॉस्पिटल, डायग्नोस्टिक, सेंटर, लसीकरण केंद्र, मेडीकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मसी, फार्मा कंपनी आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित इतर गोष्टी या पूर्णपणे सुरु राहतील.