समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते?: राज्यपाल कोश्यारी
औरंगाबाद: ‘समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते? समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते.’ असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असा […]
ADVERTISEMENT

औरंगाबाद: ‘समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते? समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते.’ असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असा आक्षेप आतापर्यंत अनेक राजकीय संघटना किंवा पक्षांनी घेतले आहेत. मात्र, आता याचबाबत राज्यपालांनी वक्तव्य केल्याने याबाबत आता नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असल्याचं सांगितांना त्यांनी समर्थ हेच शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचा दावा केला आहे.