कांदे-भुजबळ वादाचा परिणाम काहीही होवो पालकमंत्री भुजबळच असणार-जयंत पाटील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजकारणात अनेकदा वाद होतात, वादाचा काहीही परिणाम होवो नाशिकच्या पालकमंत्रीपदी छगन भुजबळच राहणार आहेत असं वक्तव्य करत जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच सुहास कांदे-छगन भुजबळ वादावर भाष्य केलं आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निहाय बैठका घेत आहेत. यावेळी निफाड विधानसभा कक्षेत्रातील बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले राजकारणात असे वाद होत असतात, वादाचा परिणाम काहीही असो नाशिकच्या पालकमंत्री पदी भुजबळच असणार आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ वादात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत भूमिकेत भुजबळ यांनी पाठराखण केली आहे.

नाशिकमधील जलसंपदा कार्यालय कुठेही जाणार नाही, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया.

हे वाचलं का?

नाशिकमधील जलसंपदा विभागाचे कार्यालय कुठेही हलणार नाही. जलसंपदा मंत्री म्हणून मी अशी नाशिककरांना ग्वाही देतो असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. नाशिकमधील जलसंपदा विभागाच्या कामांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, नाशिकमधील जलसंपदा विभागाचे कार्यालयात हलविण्यात येणार आहे असे बोलले जात असेल तर आज मी जलसंपदा मंत्री म्हणून अशी ग्वाही देतो की, एकही जलसंपदा विभागाचे कार्यालय येथून हलविण्यात येणार नाही. तसेच नाशिकमधील पर्यटनाची व्याप्ती आणखी वाढविली जाणार आहे. यात नांदूरमध्यमेश्वर येथील पक्षी अभयारण्यासह इतर सुखसोयी पर्यटकांना देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच भावली धरण परिसरही पर्यटनाचा केंद्रबिंदु होत आहे. त्यामुळे याठिकाणीदेखील पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

येथील रस्त्यांचा जो विषय आहे तोही येणाऱ्या काळात मार्गी निघेल असेही त्यांनी सांगितले. देवसाने मांजरपाडा प्रकल्पातून गुजरातला जाणारे पाणी वळवून महाराष्ट्र आणण्याचे जे प्रयत्न झालेत आहेत त्याचे कौतुक करावे तितके कमी असल्याचे सांगत पाटील यांनी भुजबळांचे कौतुक केले.

ADVERTISEMENT

भुजबळांविरुद्ध कोर्टातला अर्ज मागे घेण्यासाठी छोटा राजन टोळीचा फोन – आमदार सुहास कांदेंचा तक्रार अर्ज

काय आहे सुहास कांदे आणि भुजबळ यांचा वाद

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. एवढंच नाही तर छगन भुजबळ यांच्या विरोधात 24 सप्टेंबरला हायकोर्टात धाव घेतली आहे.

आमदार कांदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी थेट न्यायालयातच धाव घेतली. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT