कॅब बुक करणं सोप्प होणार! WhatsApp वरून करावा लागणार एक मेसेज
WhatsApp Update: सोशल मीडियाच्या काळात व्हॉट्सअॅप हे सर्वांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. व्हॉट्सअॅप (Whatsapp) नेहमीच नवनवीन फिचर्ससह अपडेट होतो. आता इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर कॅब बुक (Uber Cab Booking) करण्याची सुविधाही मिळणार आहे. विश्वास नाही ना पण, होय हे खरं आहे. आता कॅब बुकिंगसाठी कोणत्याही इतर अॅपची मदत घ्यावी लागणार नाही कराण, व्हॉट्सअॅपवरूनच ते शक्य […]
ADVERTISEMENT
WhatsApp Update: सोशल मीडियाच्या काळात व्हॉट्सअॅप हे सर्वांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. व्हॉट्सअॅप (Whatsapp) नेहमीच नवनवीन फिचर्ससह अपडेट होतो. आता इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर कॅब बुक (Uber Cab Booking) करण्याची सुविधाही मिळणार आहे. विश्वास नाही ना पण, होय हे खरं आहे. आता कॅब बुकिंगसाठी कोणत्याही इतर अॅपची मदत घ्यावी लागणार नाही कराण, व्हॉट्सअॅपवरूनच ते शक्य होणारय. व्हॉट्सअॅपवर उबर राइड बुक करता येईल. कॅब कंपनी उबर लवकरच व्हॉट्सअॅपसाठी हा नवा पर्याय जारी करणार आहे. (WhatsApp Updated Uber ride Feature Know How To Book)
ADVERTISEMENT
गेल्या वर्षी म्हणजेच २०२२मध्ये या फिचरची पहिली चाचणी घेण्यात आली होती. ही सेवा सध्या दिल्ली-एनसीआर आणि लखनऊमध्ये सुरू करण्यात आली आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर, यानंतर उबेरचे अॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. फक्त व्हॉट्सअॅप वापरूनच कॅब बुक करता येईल.
Yogesh Kadam Accident : रामदास कदम यांचे मातोश्री अन् अनिल परबांवर आरोप
हे वाचलं का?
ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेता मिळणार सर्व कॅब सुविधा!
याशिवाय व्हॉट्सअॅप यूजर्स त्यांची राइड मॅनेज करू शकतात. यूजर्स जेव्हा व्हॉट्सअॅपद्वारे उबर कॅब बुक करतात तेव्हा त्यांना याची पावतीही मिळेल. तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषेत कॅब बुक करता येईल. यूजर्सना व्हॉट्सअॅपद्वारे कॅब बुक करताना ड्रायव्हरचे नाव आणि लायसन्स प्लेट यासारखी माहिती देखील मिळेल. तसेच पिकअप पॉईंटची माहिती ठिकाणाच्या आधारे चालकाला पाठवता येईल. ड्रायव्हरशी बोलत असतानाही युजर्सची ओळख प्रायव्हेट ठेवली जाईल, याचा अर्थ ड्रायव्हर युजर्सचा व्हॉट्सअॅप नंबर पाहू शकणार नाही.
ADVERTISEMENT
‘या’ क्रमांवर मेसेज करून उबर कॅब राइड बुक करता येणार..
ADVERTISEMENT
WhatsAppवर उबर कॅब बुक करण्यासाठी उबरचा +91-7292000002 हा अधिकृत क्रमांक सेव्ह करावा लागेल. हा क्रमांक सेव्ह केल्यानंतर, व्हॉट्सअॅपवर जाऊन त्यांना ‘Hi’ असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर पिकअप आणि ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणाचा पूर्ण पत्ता पाठवावा लागेल. पिकअपसाठी लाइव्ह लोकेशन देखील शेअर करू शकता. यानंतर उबर कॅब राइडचे भाडे आणि इतर आवश्यक माहिती शेअर करेल. त्यानंतर कॅब कन्फर्म केल्यावर उबरद्वारे कॅब बुक झाल्याचा मेसेज येईल. अशा प्रकारे आपल्याला कॅब बुक करता येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT