नोटांवर कधी आणि कसे आले महात्मा गांधी? त्यांचा फोटो हटवता येतो का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत गणपती आणि देवी लक्ष्मीचे फोटो लावण्याची मागणी केली. गुजरात निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्या या विधानाकडे ‘हिंदुत्व कार्ड’ म्हणून पाहिले जात आहे. ही मागणी करत केजरीवाल म्हणाले की, नोटेवर एका बाजूला गांधीजी आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी-गणेश यांचा फोटो असेल तर संपूर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल.

नोटांवर गांधीजींच्या फोटोवरून यापूर्वीही अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. नोटांवरून महात्मा गांधींचे फोटो हटवावे, असे काहींचे म्हणणे आहे. तर महात्मा गांधींचे चित्र असावे असे काहींचे म्हणणे आहे, पण बाकीच्या नोटांवर इतर महापुरुषांचे चित्रही छापले पाहिजे. काही दिवसांपूर्वीच अखिल भारतीय हिंदू महासभेनेही नोटांवर महात्मा गांधींऐवजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चित्र छापावे, अशी मागणी केली होती.

पण तसं होऊ शकतं का?

याचे साधे उत्तर आहे, नाही. स्वातंत्र्यानंतर बरीच वर्षे नोटांवर अशोक स्तंभ किंवा इतर चिन्हे छापण्यात आली. महात्मा गांधींचा फोटो लावण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण संपूर्ण देशात त्यांना स्वीकारणारे लोक होते. गांधीजींशिवाय इतर महापुरुषाचे फोटो छापल्यास त्यावरून वाद आणि विरोध होऊ शकतो, असे मानले जाते. यामुळेच नोटांवर महात्मा गांधींचे चित्र छापण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नोटांवर महात्मा गांधींऐवजी दुसऱ्या महापुरुषाचे चित्र छापावे का? याबाबत रिझर्व्ह बँकेची (RBI) एक समिती स्थापन करण्यात आली होती. नोव्हेंबर 2014 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सांगितले की, आरबीआय समितीने महात्मा गांधींशिवाय इतर कोणाचेही चित्र न छापण्याचा निर्णय घेतला आहे, कारण गांधीजींपेक्षा देशाच्या स्वभावाचे प्रतिनिधित्व कोणी करू शकत नाही.

या वर्षी जूनमध्ये नोटांवरून महात्मा गांधींचे फोटो काढून टाकण्यात येणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण आरबीआयने याचा इन्कार केला होता. नोटांवरून महात्मा गांधींचे चित्र हटवण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे आरबीआयने एक निवेदन जारी करून स्पष्ट केले होते.

ADVERTISEMENT

भारतातील नोटांचा इतिहास काय आहे?

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950 रोजी तयार झाला. तोपर्यंत रिझर्व्ह बँक फक्त प्रचलित चलनी नोटाच जारी करत होती. रिझव्‍‌र्ह बँकेच्या वेबसाइटनुसार, सरकारने 1949 मध्ये पहिल्यांदा एक रुपयाची नवी नोट तयार केली. त्यावेळी नोटांवर ब्रिटनच्या महाराजांचं चित्र छापण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

एका वृत्तानुसार, त्यावेळी ब्रिटनच्या महाराजांऐवजी महात्मा गांधींचे चित्र छापण्यात यावे, असे मान्य करण्यात आले होते, परंतु नंतर नोटांवर अशोक स्तंभाचे चित्र छापले जाईल, असे ठरले. 1950 मध्ये पहिल्यांदा 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. या सर्व नोटांवर अशोक स्तंभाचे फोटो छापण्यात आले होते. 1953 मध्ये नोटांवर हिंदी ठळकपणे छापण्यात आली होती. त्यानंतर 1954 मध्ये एक हजार, दोन हजार आणि 10 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आल्या, मात्र 1978 मध्ये त्या नोटाबंदी करण्यात आल्या, म्हणजेच चलनातून काढून टाकण्यात आल्या.

जेव्हा पहिल्यांदा गांधीजींचा छापण्यात आला

1969 मध्ये महात्मा गांधींच्या 100 व्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच चलनावर महात्मा गांधींचे चित्र छापण्यात आले. यामध्ये महात्मा गांधी बसलेले दाखवले होते. 1972 मध्ये रिझर्व्ह बँकेने 20 रुपयांच्या नोटा आणि 1975 मध्ये 50 रुपयांच्या नोटा जारी केल्या. 80 च्या दशकात पुन्हा नवीन मालिका नोटा जारी करण्यात आल्या. 1 रुपयांच्या नोटेवर तेलाची विहीर, 2 रुपयांच्या नोटेवर आर्यभट्टाची उपग्रह प्रतिमा, 5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरने शेत नांगरणारा शेतकरी आणि 10 रुपयांच्या नोटेवर कोणार्क मंदिराचे चाक, मोर आणि शालिमार बाग छापण्यात आले होते.हा तो काळ होता जेव्हा अर्थव्यवस्था वाढत होती आणि लोकांची क्रयशक्तीही वाढत होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने 500 रुपयांची नोट जारी केली. त्यावर महात्मा गांधींचे चित्र छापण्यात आले होते. अशोक स्तंभाला वॉटरमार्क लावण्यात आले.

1996 मध्ये नवीन सीरीज नोट्स आल्या

1996 मध्ये, रिझर्व्ह बँकेने अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह ‘महात्मा गांधी सीरीज’च्या नवीन चलनी नोटा जारी केल्या. वॉटरमार्कही बदलले. असे वैशिष्ट्य देखील त्यात जोडण्यात आले आहे, जेणेकरून अंध व्यक्तींनाही नोट सहज ओळखता येईल. 9 ऑक्टोबर 2000 रोजी RBI ने 1000 रुपयांची नोट जारी केली. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी झाली. महात्मा गांधी मालिकेतील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. यानंतर 2 हजार रुपयांची नोट जारी करण्यात आली. त्यातही गांधीजींचा फोटो छापण्यात आला होता.

नोटांवर फोटो कधी छापले होते?

अनेकदा मनात प्रश्न येतो की नोटेवर महात्मा गांधींचे चित्र कधीपासून छापले आहे? हे चित्र 1946 मध्ये घेण्यात आले होते. महात्मा गांधी लॉर्ड फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स व्हिक्टरी हाऊसमध्ये आले तेव्हा हे फोटो घेण्यात आले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT