पतीने दुबईत नोकरी करून पत्नीला शिकवलं! सरकारी क्लर्क होताच बायको तरुणासोबत पळाली..प्रकरण थेट कोर्टात!
Married Woman Shocking Viral News : ज्योती मोर्य प्रकरणाची दोन वर्षांपूर्वी खूप चर्चा झाली होती. सरकारी अधिकारी बनल्यानंतर ज्योतीने तिच्या पतीला धोका दिला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सरकारी नोकरी मिळताच पत्नीने नवऱ्याला दिला धोका

पत्नीने जमिन विकली अन् सासू सासऱ्यांना..

पती दुबईहून परतल्यावर किराणाचं दुकान उघडलं, पण..
Married Woman Shocking Viral News : ज्योती मोर्य प्रकरणाची दोन वर्षांपूर्वी खूप चर्चा झाली होती. सरकारी अधिकारी बनल्यानंतर ज्योतीने तिच्या पतीला धोका दिला होता. अशाच प्रकारची एक घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये घडली आहे. येथील एक व्यक्ती अनेक वर्षांपासून दुबईत नोकरी करत होता. जेणेकरून तो पत्नीला चांगलं शिकवू शकेल. पत्नीच्या शिक्षणासाठी पतीने सर्वतोपरी सहकार्य केलं. त्यानंतर पत्नीला सरकारी विभागात क्लर्कची नोकरी लागली. पण त्यानंतर जो खेळ सुरु झाला, त्यामुळे पतीच्या पायाखालची वाळूच सरकली.
पत्नीने जमिन विकली अन् सासू सासऱ्यांना..
पत्नीचं दुसऱ्या तरुणासोबत प्रेम जडलं. ती एक दिवस घर सोडून निघून गेली, असा आरोप आहे. पतीने तिच्या नावावर केलेली जमिनही तिने विकली. इतकच नव्हे तर सासू-सासऱ्यांना मारहाण केली. आता तिला पतीसोबत राहायचं नाहीय, तिने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
हे ही वाचा >> हॉटेलमध्ये मोठा कांड! खिडकीवर पडदा नव्हता, लोकांनी सगळंच पाहिलं..कपलचा प्रायव्हेट Video लीक
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर एसपी नार्थ यांनी तपासाचे आदेश दिले. पीडित तरुणाने पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटलंय, अनेक वर्ष दुबईत राहून नोकरी करत होता. पत्नीला सरकारी नोकरी मिळावी यासाठी तिच्या शिक्षणासाठी पैसे द्यायचो. त्यांना 14 वर्षांचा मुलगाही आहे. काही बचत करून त्याने पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली होती. काही महिन्यांपूर्वी पत्नी सरकारी विभागात लिपिक बनली होती. याचदरम्यान, तिचं दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम जडलं.
दुबईहून परतल्यावर किराणाचं दुकान उघडलं
पतीने पोलिसांना सांगितलं, पत्नीला नोकरी मिळाल्यानंतर तो दुबईहून घरी परतला. त्यानंतर त्याने एक किराणा दुकान उघडलं. त्याने आरोप केला आहे की, काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून गेली. खरेदी केलेली जमिन विकली. एक दिवस ती दुकानावर आली आणि सासू सासऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर म्हटलं, मला तुमच्या मुलाकडून घटस्फोट घ्यायचा आहे. त्यानंतर तिने कोर्टात अर्ज दाखल केला. याप्रकरणाचा तपास सुरु आहे.