हनिमूनसाठी रात्रभर जागले पती-पत्नी, सकाळ होताच पती रडत-रडत आईला म्हणाला; 'माझी बायको तर..'
हरियाणाच्या रेवाडीमध्ये एका नवीन लग्न झालेल्या जोडप्यासोबत त्यांच्या हनीमूनच्या रात्री वेगळाच प्रकार घडला. हनीमूनच्या रात्री पूर्ण रात्र जागल्यानंतर नवरा सकाळी उठल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. रडत रडत म्हणाला, "माझी बायको तर...".

बातम्या हायलाइट

हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी नवऱ्याला बसला मोठा धक्का

सकाळी उठल्यानंतर नवरा रडत रडत म्हणाला, "माझी बायको तर.."

हरियाणामधील धक्कादायक प्रकार
Haryana News: लग्नानंतर पहिली रात्र ही प्रत्येक नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोंसाठी खूपच खास असते. या दिवसापासून त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. मात्र हरियाणाच्या रेवाडीमध्ये एका नवीन लग्न झालेल्या जोडप्यासोबत त्यांच्या हनीमूनच्या रात्री वेगळाच प्रकार घडला. पूर्ण रात्र जागल्यानंतर नवरा जेव्हा सकाळी वेळाने उठला, तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला आणि तो आपल्या आईकडे रडत रडत जाऊन म्हणाला, "माझी बायको तर..." जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
खरंतर, खंडोदा गावात राहणाऱ्या जलदीप नावाच्या व्यक्तीची भेट सोहाले नावाच्या एका माणसाशी झाली. सोहाले यांनी आधी अनेक लग्न जमवली होती आणि त्याच्या बोलण्यात येऊन जलदीपच्या वडिलांनीही सोहालेला जलदीपच्या लग्नासाठी मुलगी शोधण्यास सांगितलं.
लग्न ठरलं, पण...
मे महिन्यातच सोहले जलदीपच्या वडिलांना त्यांच्या गावी म्हणजेच उत्तर प्रदेशला घेऊन गेले, तिथे जलदीपची पूजा नावाच्या मुलीशी ओळख झाली. सर्वांना पूजा खूपच आवडली आणि नंतर त्या दोघांचं लग्न ठरलं. 4 जून रोजी वधू-वरांना मंदिरात नेण्यात आलं आणि हिंदू विधीनुसार लग्न संपन्न झालं. यानंतर, मुलाचे कुटुंबीय 5 जून रोजी त्यांच्या घरी परतले आणि त्यावेळी वधु आणि वराचं त्यांच्या घरात थाटामाटात स्वागत झालं.
हे ही वाचा: Exclusive: सोनाराने अवघ्या 20 रुपयात दिला सोन्याचा दागिना, 'ते' आजी-आजोबा पाहा आता काय म्हणाले!
हनीमूनच्या रात्रीत नेमकं काय घडलं?
सून-मुख पाहण्याच्या विधीदरम्यान नवरीला चांदीचं पैंजण आणि सोन्याचं मंगळसूत्र देण्यात आलं. यानंतर, जलदीप आणि त्याची पत्नी रात्री त्यांच्या खोलीत झोपायला गेले. हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा जलदीप सकाळी उठला तेव्हा त्यावेळी त्याची बायको त्याला दिसली नाही. त्यानंतर जलदीपने सगळ्या घरात शोधलं पण त्याला पूजा कुठेच सापडली नाही. सगळं घर शोधल्यानंतर घरातील पैसे आणि दागिने गायब असल्याचं समोर आलं. पूजाला लग्नात दिलेले सर्व दागिने आणि 20 हजार रुपये रोख पैसे घेऊन ती पळून गेल्याचं कळालं.
हे ही वाचा: Video: ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये कुटाकुटी, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, डोकं फोडलं! घडलं तरी काय?
जलदीपच्या वडिलांनी रेवाडीच्या बावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिकारी एसआय सुरेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वधू आणि आरोपी मध्यस्थांचा शोध घेतला जात आहे. पीडितेने दिलेल्या पत्त्यावरही पोलिस छापा टाकतील.