Exclusive: सोनाराने अवघ्या 20 रुपयात दिला सोन्याचा दागिना, 'ते' आजी-आजोबा पाहा आता काय म्हणाले!
Viral Video: छत्रपती संभाजीनगरमधील एका ज्वेलर्स दुकानाच्या मालकाने एका 93 वर्षीय आजोबांना आणि त्यांच्या पत्नीला अवघ्या 20 रुपयात सोन्याचे दागिने दिले. ज्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्याच आजी-आजोबांनी आता मुबंई तकसोबत बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ADVERTISEMENT

इसरार चिस्ती, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर परिसरातील 93 वर्षीय आजोबा आणि त्यांची पत्नी यांच्या ज्वेलर्सच्या दुकानातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. ज्यामध्ये ज्वेलर्स दुकान मालकाने आजी-आजोबांशी आपुलकीने गप्पा तर मारल्याच पण त्यासोबतच त्यांना सोन्याचे काही दागिने देखील देऊ केले. अवघे 20 रुपये घेऊन मालकाने या वृद्ध दाम्पत्याला दागिने दिले. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून सध्या ज्वेलर्स मालकाचं प्रचंड कौतुक होत आहे. दरम्यान, ज्या आजी-आजोबांचं व्हिडिओ व्हायरल झाला त्यांना गाठून मुंबई Tak त्यांच्या भावना काय ते जाणून घेतलं.
'त्या' आजी-आजोबांची मुंबई Tak सोबत एक्स्क्लुझिव्ह गप्पा
दरम्यान, सोनाराच्या दुकानातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या आजी-आजोबांनी त्यांची नेमकी कहाणी मुंबई Tak सोबत बोलताना सांगितली. पाहा ते नेमकं काय म्हणाले.
आजोबा: सोनाराला द्यायचे पैसे आम्ही महिनाभर गोळा करत होतो. 1-1 रुपया आम्ही गोळा केला. 1100 रुपये जमा केले होते. 15-16 वर्षांपासून मला तिला (बायकोला) पोत घ्यायची होती पण आमच्याकडे खायला देखील पैसे नव्हते.
जालनाच्या इकडे आमचं मूळ गाव आहे. पण आता इकडे आम्ही मागून उदरनिर्वाह करतो आमचा..