राहुल गांधी मुंबईत येणार आहेत तेव्हा कलम 144 लावणार का? ओवेसींचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एमआयएमच्या तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लावलं गेलं आहे. कलम 144 हे जमावबंदीचं कलम आहे. त्यावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. याच महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधीही मुंबईत येणार आहेत, त्यावेळीही कलम 144 लागू केलं जाणार का? असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतल्या चांदिवली या भागात झालेल्या सभेत बोलत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी ठाकरे सरकावर घणाघाती हल्ला चढवला. आमची रॅली होणार म्हटल्यावर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं. आता राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. तेव्हाही 144 कलम लावणार की फुलं उधळून त्यांचं स्वागत करणार आहात? असा सवाल करतानाच राहुल गांधी ज्यावेळी मुंबईत येणार आहे ओमिक्रॉनची चर्चा होणार नाही. केवळ सत्तेची चर्चा होईल. आमच्या रॅलीवेळी मात्र ओमिक्रॉनची चर्चा होते आहे.

शिवसेनेला कायमच राष्ट्रवाद राष्ट्रवाद असं म्हणत असते. मग त्यांना तिरंगा झेंड्याचं वावडं का? आम्ही तिरंगा हातात घेतला यात काय गुन्हा केला का? दलित बांधव आणि मुस्लिम बांधव यांनी तिरंगा हाती घेतला तर यांची पोटदुखी वाटते. आता सरकार तिरंग्याच्या विरोधात झालं आहे. मुस्लिमांचा विरोध मी समजू शकतो. एमआयएमचा विरोध समजू शकतो. पण तिरंग्याचा विरोध का? असा सवाल त्यांनी केला. ते सत्तेत आहेत, मात्र तुम्ही कुठे आहात? तुम्ही त्यांच्या दरवाज्याच्यावरही त्यांनी. तुमचं काम फक्त यांना जेवण बनवण्यासाठी मदत करण्याचं आहे.

हे वाचलं का?

तुम्ही बनवलेल्या अन्नावर हे सत्ताधारी डल्ला मारत आहेत. हेच लोक सांगतात एमआयएमला मतदान करू नका सांगणारेच आहेत. एमआयएम मतांची विभागणी करतील अशी भीत कायमच तुम्हाला दाखवली जाते. आता जातीयवाद्यांसोबत बसून भोगत आहेत, असं सांगतानच आमच्यामुळे जर मत विभागणी होत असेल तर उद्धव ठाकरे धर्मनिरपेक्ष आहे का? असाही प्रश्न ओवेसी यांनी विचारला आहे.

तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही. तुम्ही कुणालाही मतदान करावं हा तुमचा हक्क आहे. पण तुम्ही कधीपर्यंत फसवले जाणार आहात. बाबरी मशिद पडल्यानंतर मुंबईत हिंसाचार झाला त्यानंतर तरी तुमचे डोळे उघडायला हवे होते. पण तुम्ही सर्व विसरला. तुम्हाला धर्मनिरपेक्षता दाखवली गेली. भारतातील मुसलमानांना विचारतो धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला काय मिळालं? धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला केवळ घोषणा दिल्या, आश्वासने दिले, पण आरक्षण मिळालं नाही, मशीद मिळाली नाही. मशिद पाडणाऱ्यांनी शिक्षा मिळाली नाही. न्याय मिळाला नाही. पण तरीही आपण धर्मनिरपक्षेतेला भुलतो असंही ओवेसी म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT