जिथे-जिथे निवडणूक, तिथे-तिथे जातीय तणाव… निव्वळ योगायोग की राजकीय डाव?

मुंबई तक

मुंबई: ‘इस बार दंगा बहुत बड़ा था, खूब हुई थी ख़ून की बारिश, अगले साल अच्छी होगी फसल मतदान की’ भारतातील राजकीय व्यवस्थेचा वेध घेत या ओळी अनेक दशकांपूर्वी लिहिल्या गेल्या होत्या, पण आजही देशात घडत असलेल्या जातीयवादी घटनांवर ही टिप्पणी अचूक लागू होत असल्याचं दिसतं आहे. 2022 वर्ष सुरू झाले तेव्हा देश कोव्हिडची दुसरी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: ‘इस बार दंगा बहुत बड़ा था, खूब हुई थी ख़ून की बारिश, अगले साल अच्छी होगी फसल मतदान की’ भारतातील राजकीय व्यवस्थेचा वेध घेत या ओळी अनेक दशकांपूर्वी लिहिल्या गेल्या होत्या, पण आजही देशात घडत असलेल्या जातीयवादी घटनांवर ही टिप्पणी अचूक लागू होत असल्याचं दिसतं आहे.

2022 वर्ष सुरू झाले तेव्हा देश कोव्हिडची दुसरी लाट मागे टाकून यूपीसह पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त झाला होता. निवडणुका झाल्या, निकाल आले आणि वेगवेगळ्या राज्यांत सरकारं आली. दरम्यान, भारतातील राजकीय पक्ष हे नेहमीच निवडणूक मोडमध्ये असतात असे म्हटले जाते. कारण एका ठिकाणी निवडणुका संपल्या की इतर ठिकाणच्या निवडणुकांची तयारी सुरू झालेली असते.

आता याला योगायोग म्हणा किंवा राजकीय षडयंत्र पण ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे जातीयवादाची विषारी हवा पसरवली जात असल्याचं उघड्या डोळ्यांनी आपल्याला पाहायला मिळत आहे.

छोट्या-छोट्या घटना या मोठ्या जातीय तणावाचे कारण बनत आहेत. किरकोळ घटनांवरुन देखील जमाव रस्त्यावर येतो आणि कायदा व सुव्यवस्था अक्षरशः मोडीत निघते. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर अशा घटनांचा बराच गाजावाजा होतो आणि रोज कुठल्या ना कुठल्या भागातून अशा बातम्या आता समोर येऊ लागल्या आहेत. मग ते राजस्थान असो, कर्नाटक असो, गुजरात असो की दिल्ली नाहीतर महाराष्ट्र. जिथे विधानसभा, महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत तिथे अशा घटना अधिक तीव्रतेने घडत असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp