पंजाब पोलिसांची झोप उडवणारा अमृतपाल सिंग कोण? प्रकरण गंभीर!
Khalistani leader Amritpal Singh : पंजाब पोलिसांची एका माणसाने झोप उडवलीये. उच्च न्यायालयाचे फैलावर घेतल्याने पंजाब पोलीस रात्रंदिवस शोध घेतायेत. इतकं वाचल्यावर तो व्यक्ती कोण याची कल्पना तुम्हाला आली असेल? ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगायचं म्हणजे तो व्यक्ती आहे अमृतपाल सिंग! (Who is Khalistani leader Amritpal Singh) तर याच अमृतपाल सिंगने पंजाब पोलिसांच्या नाकीनऊ आणलेत. […]
ADVERTISEMENT
Khalistani leader Amritpal Singh : पंजाब पोलिसांची एका माणसाने झोप उडवलीये. उच्च न्यायालयाचे फैलावर घेतल्याने पंजाब पोलीस रात्रंदिवस शोध घेतायेत. इतकं वाचल्यावर तो व्यक्ती कोण याची कल्पना तुम्हाला आली असेल? ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगायचं म्हणजे तो व्यक्ती आहे अमृतपाल सिंग! (Who is Khalistani leader Amritpal Singh) तर याच अमृतपाल सिंगने पंजाब पोलिसांच्या नाकीनऊ आणलेत. पंजाब पोलीस एखाद्या सावजसारखा त्याचा शोध घेताहेत. अमृतपालला फरार घोषित करण्यात आलंय. दुसरीकडे अमृतपाल सिंगच्या बाजूने उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आलीये.पंजाबमध्ये सध्या शहरांपासून ते गावाखेड्यापर्यंत एकच चर्चा आहे, ती म्हणजे अमृतपाल सिंग कुठेय? त्यामुळे कोण आहे हा अमृतपाल आणि पंजाब पोलीस त्याचा शोध का घेताहेत? हे समजून घेणं फार महत्वाचं आहे.(Who Is Amritpal Singh And Why He is Most-Wanted for Punjab police)
ADVERTISEMENT
अमृतपाल सिंग चर्चेत कसा आला?
काही दिवसांपूर्वी खलिस्तानी समर्थक आणि वारीस पंजाब दे संघटनेचे समर्थक थेट पोलिसांशी भिडले. तिथून या प्रकरणाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तर याच प्रकरणात दोघांना अटक झाली आणि अटकेनंतर संघटनेच्या सदस्य पोलीस स्टेशनवर जाऊन धडकले. त्यांनी अटक केलेल्या दोघांना सोडण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी धुडगूस घातला, यात सहा पोलीस जखमी झाले.
स्वत:ला खलिस्तान समर्थक आणि शिख धर्म गुरु समजणाऱ्या अमृतपाल सिंगने थेट पोलिसांनाच आव्हान दिलं. “जोपर्यंत त्याच्या साथीदारावरची तक्रार मागे घेतली जात नाही तोपर्यंत तो शांत बसणार नाही”, असं तो म्हणाला.
हे वाचलं का?
ब्रिटनमधील मुलीशी लग्न, भिंद्रनवाल्याशी तुलना; कोण आहे अमृतपाल सिंग?
India Today च्या रिपोर्टनुसार अमृतपालविषयी आता गुप्त माहिती समोर आलीये. याच रिपोर्टनुसार असं समजलंय की, या व्यक्तीचे ISI सोबत संबंध होते. भारतात येण्यापूर्वी अमृतपालने जॉर्जीयात ISI (पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा) कडून प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याच्याकडे पंजाबमध्ये दहशत माजवण्याचा पूर्ण प्लॅन तयार होता. अमेरिकेत shikh for justice म्हणजेच SFJ नावाच्या संघटनेसोबतही अमृतपालचे संबंध होते. SFJच्या अनेक प्रचारांमध्ये त्याने सहभाग घेतला होता.
ADVERTISEMENT
दुबईत ब्रेनवॉश, जॉर्जियात ट्रेनिंग… अमृतपाल सिंग असा झाला ISI चा बाहुला
ADVERTISEMENT
ISI ने अनेक दहशतवाद्यांना मदत देण्यासाठी काही फंड्स त्यासोबतच हत्यारांचादेखील पुरवठा केला होता. दुबईत राहताना अमृतपाल ISIच्या संपर्कात आला. त्याला जे पैसे ऑफर केले गेले होते, त्यानंतरच त्याने भारतविरोधी कृती सुरु केली. पाकिस्तानसारखा देश जो स्वत:च मोठ्या आर्थिक संकंटात सापडलाय, तोच देश भारताला नुकसान पोहोचवण्यासाठी अमृतपालसारख्या लोकांना खेळणं बनवत असल्याचही समोर आलंय.18 मार्चला दुपारी अशी माहिती समोर आली की पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगला ताब्यात घेतलंय. पण संध्याकाळ होताच अमृतपाल पोलिसांच्या ताब्यातून सुटून फरार झालाय. पोलिसांची आताही छापेमारी सुरुच आहे.
Earthquake : उत्तर भारत भूकंपाने हादरला; 7.7 रिश्टर स्केलची तीव्रता
पोलिसांनी वारीस पंजाब दे या संघटनेशी जोडलेल्या तब्बल 78 लोकांना ताब्यात घेतलंय. या सगळ्यांजवळ असणारे सगळी हत्यारं पोलिसांनी जप्त केली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार 9 रायफल्स, तर एक रिव्हॉलवर जप्त केल्या आहेत. अमृतपाल सिंगचे वडील तरसेम सिंग यांनी सांगितलं की, त्यांना त्यांच्या मुलाबद्दल काहीही माहिती नाहीये. तरसेम सिंग यांना स्वत:च असं वाटतं की अमृतपालविषयी त्यांनी ठोस माहिती मिळायला हवी. त्यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी 3 ते 4 तास तरसेम सिंग यांच्या घराची झडती घेतली. आता या प्रकरणाला काय नवीन वळण मिळणार, हे आगामी काही दिवसात कळेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT