राहुल गांधींना भारत जोडो यात्रा होल्डवर ठेवून गुजरातला बोलवणारे अनंत पटेल कोण?

मुंबई तक

श्रेया बहुगुणा, प्रतिनिधी, न्यूज तक राहुल गांधी दोन महिन्यांहून अधिक काळ भारत जोडो यात्रेला निघाले आहेत.. त्यांच्या या यात्रेला प्रचंड जनसमर्थन मिळत आहे.. हिमाचल आणि गुजरात विधानसभा निवडणुका पाहता राहुल गांधींनी या राज्यांमध्ये आपली उपस्थिती वाढवली पाहिजे असं मत राजकीय जाणकारांनी मतही व्यक्त केलं होतं. मात्र याच दरम्यान सर्वांना आश्चर्याचा धक्का देत राहुल गांधी २१ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

श्रेया बहुगुणा, प्रतिनिधी, न्यूज तक

राहुल गांधी दोन महिन्यांहून अधिक काळ भारत जोडो यात्रेला निघाले आहेत.. त्यांच्या या यात्रेला प्रचंड जनसमर्थन मिळत आहे.. हिमाचल आणि गुजरात विधानसभा निवडणुका पाहता राहुल गांधींनी या राज्यांमध्ये आपली उपस्थिती वाढवली पाहिजे असं मत राजकीय जाणकारांनी मतही व्यक्त केलं होतं. मात्र याच दरम्यान सर्वांना आश्चर्याचा धक्का देत राहुल गांधी २१ नोव्हेंबरला गुजरातच्या रॅलीत पोहोचले. काँग्रेसला या रॅलीचा फायदा आदिवासी आणि पटेल समाजात झाल्याचे बोललं जातंय. पण तुम्हाला माहित आहे का की राहुल गांधी भारत जोडो यात्रा होल्डवर ठेवून गुजरातला का पोहोचले ते? राहुल गांधी अनंत पटेल यांच्या बोलावण्यावरुन गुजरातला गेले होते. ज्यांच्या बोलण्यावर राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडून गुजरातला गेले ते अनंत पटेल कोण आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

कोण आहेत अनंत पटेल?

अनंत पटेल यांची पहिली ओळख ही ट्युशन टिचर अशी दिली जाते. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले पटेल हे आज आदिवासी समाजाचे मोठे नेते मानले जातात. २०१७ मध्ये ते पहिल्यांदाच आमदार झाले. अनंत पटेल यांच्याबाबत समजून घ्यायचं असेल तर या गोष्टीपासून सुरुवात केली पाहिजे. या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात गुजरातमधील पार-तापी आणि नर्मदा नदीला जोडून सौराष्ट्र आणि कच्छसारख्या कोरड्या भागात पाणी पोहोचवण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे या भागातील दुष्काळाची समस्या संपुष्टात येऊ शकली असती. मात्र या प्रकल्पामुळे वलसाड, डांग, तापी जिल्ह्यांतील आदिवासींना मोठ्या प्रमाणावर विस्थापित व्हावं लागणार असल्याने ५० हजार लोकांना थेट फटका बसला असता.

आदिवासी नेते ही अनंत पटेल यांची मुख्य ओळख

याच कारणास्तव, २५ मार्च रोजी, गुजरातच्या आदिवासींनी या रिवाक लिंक प्रकल्पाला जोरदार विरोध केला.. त्याची झळ गांधीनगरपर्यंत पोहोचली. याचा परिणाम झाला आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ही योजना मागे घेण्याची घोषणा केली.. या आंदोलनाते नेते होते अनंत पटेल…. ४५ वर्षांचे पटेल, काँग्रेसचे आमदार आणि आदिवासी नेते आहेत. २०१७ मध्ये ते नवसारी जिल्ह्यातील वासंदा मतदारसंघातून १८००० हून अधिक मतांनी विजयी झाले. ५२ टक्के मत मिळवत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. नवसारी जिल्ह्यातील वासंदा ही एकमेव सीट आहे जी वलसाड लोकसभा मतदारसंघात येते.

हे वाचलं का?

    follow whatsapp