Who is Ananya Panday: ड्रग्स कनेक्शनमध्ये समोर आलेली अनन्या पांडे नेमकी आहे तरी कोण?

मुंबई तक

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा अटकेत असतानाच आता दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हीचं देखील नाव ड्रग्स कनेक्शनमध्ये समोर आलं आहे. त्यामुळे अनन्या सध्या खूपच चर्चेत आहे. अनन्या पांडे बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. जाणून घेऊयात अनन्या नेमकी कोण आहे आणि ती नेमकी काय करते. 22 वर्षीय अनन्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा अटकेत असतानाच आता दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हीचं देखील नाव ड्रग्स कनेक्शनमध्ये समोर आलं आहे. त्यामुळे अनन्या सध्या खूपच चर्चेत आहे. अनन्या पांडे बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. जाणून घेऊयात अनन्या नेमकी कोण आहे आणि ती नेमकी काय करते.

22 वर्षीय अनन्या पांडे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. तिने आपले शालेय शिक्षण धीरूभाई इंटरनॅशनल अंबानी स्कूलमधून पूर्ण केले आहे.

अनन्याने एका मोठ्या बॅनरच्या सिनेमासह बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने तिला पहिला ब्रेक दिला होता. या चित्रपटात टायगर श्रॉफ हा हिरो होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा काही चालला नाही. पण अनन्या लोकांचा पसंतीस उतरली होती. यासाठी अनन्याला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

हे वाचलं का?