क्रूझ ड्रग्ज केस: प्लेचर पटेल आणि NCB अधिकाऱ्यांचा काय संबंध? नवाब मलिकांचा ट्विटरद्वारे आणखी एक गौप्यस्फोट

मुंबई तक

ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानच्या मुलावर अटकेची कारवाई केल्यानंतर चर्चेत आलेल्या NCB वर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक आरोप केलाय. नवाब मलिक यांनी मुंबई क्रुज ड्रग केस प्रकरणात फ्लेचर पटेल या आणखी एका नावाचा उल्लेख केलाय. मलिक यांनी ट्विट करत हा प्रश्न उपस्थित केलाय की हा फ्लेचर पटेल कोण आणि त्याचं NCB च्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानच्या मुलावर अटकेची कारवाई केल्यानंतर चर्चेत आलेल्या NCB वर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक आरोप केलाय. नवाब मलिक यांनी मुंबई क्रुज ड्रग केस प्रकरणात फ्लेचर पटेल या आणखी एका नावाचा उल्लेख केलाय. मलिक यांनी ट्विट करत हा प्रश्न उपस्थित केलाय की हा फ्लेचर पटेल कोण आणि त्याचं NCB च्या एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहेत?

मुंबई क्रुझ ड्रग केस प्रकरणात पंच म्हणून काम करणारे के.पी. गोसावी आणि मनिष भानुषाली यांना NCB ओळखत नाही असं NCB ने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. मात्र नवाब मलिकांनी यांनी आज नवा आरोप केला आहे. मलिक यांच्या म्हणण्यानुसार NCB ने टाकलेल्या या आधीच्या अनेक धाडींमध्ये मनिष भानुषाली आणि के.पी. गोसावी हे पंच होते.

नवाब मलिकांनी NCB ने मनिष भानुषाली आणि के.पी. गोसावी यांच्या पंच असण्यावर म्हटलं होतं की प्रत्येक केस साठी स्वतंत्र पंच असतात. पण नवाब मलिकांचं म्हणणं आहे की त्यांच्या हाती लागलेल्या डॉक्युमेंटनुसार काही पंच हे NCB च्या अनेक केसमध्ये पंच असल्याचं दिसतंय. यात त्यांनी फ्लेचर पटेल या व्यक्तीचा उल्लेख करत पटेल अनेक केसमध्ये पंच म्हणून काम केल्याचा आरोप केलाय.

सकाळी मुंबई क्रुज ड्रग प्रकरणात एक मोठा खुलासा करणार असल्याचं नवाब मलिकांनी सांगितलं होतं. यानंतर मलिकांनी ट्विट करत हा फ्लेचर पटेल कोण ज्याचा एनसीबी अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी फ्लेचर आणि समीर वानखेडे असा एक फोटो शेअर केला ज्यावरुन ते अधिकारी समीर वानखेडेच आहे का असा सवाल उपस्थित होतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp