आर्यन खानसोबत NCB ने अटक करण्यात आलेली मुनमुन धमेचा आहे तरी कोण?

मुंबई तक

शनिवारी रात्री मुंबईवरुन गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रूझवर छापेमारी करत NCB ने अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ८ जणांवर कारवाई केली. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. आर्यन खानसह अटक केलेल्या सर्व आरोपींना कोर्टाने एका दिवसाची NCB कोठडी सुनावली. आर्यन खानसोबतच NCB ने या छापेमारीत मुनमुन धमेचा आणि अरबाज सेठ मर्चंट यांच्यासह आणखी व्यक्तींवर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

शनिवारी रात्री मुंबईवरुन गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रूझवर छापेमारी करत NCB ने अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ८ जणांवर कारवाई केली. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. आर्यन खानसह अटक केलेल्या सर्व आरोपींना कोर्टाने एका दिवसाची NCB कोठडी सुनावली. आर्यन खानसोबतच NCB ने या छापेमारीत मुनमुन धमेचा आणि अरबाज सेठ मर्चंट यांच्यासह आणखी व्यक्तींवर कारवाई केली.

प्रसारमाध्यमांमध्ये मुनमुन धमेचाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ती नेमकी आहे तरी कोण याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार मुनमुन धमेचा ही एका व्यवसायिकाची मुलगी आहे. तसेच अरबाज सेठ मर्चंट हा आर्यन खानचा जवळचा दोस्त मानला जातो. त्यामुळे आर्यन खानसोबतच चर्चेत असलेली मुनमुन आहे तरी कोण याचा आपण आढावा घेणार आहोत.

मुनमुन धमेचा ही एका व्यवसायिकाची मुलगी असून ती फॅशन मॉडेल आहे. वय वर्ष ३९ असलेल्या मुनमुनला NCB ने शनिवारी रात्री ताब्यात घेतलं होतं. मुनमुन ही मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातली रहिवासी आहे. सध्याच्या घडीला तिच्या परिवारातील कोणताही सदस्य मध्य प्रदेशात राहत नाही. मुनमुनच्या आईचं गेल्या वर्षी निधन झालं. मुनमुनचे वडील अमित कुमार धमेचा यांचंही काही वर्षांपूर्वी निधन झालं.

हे वाचलं का?