पुजा चव्हाण प्रकरणी चर्चेत असलेले संजय राठोड आहेत तरी कोण??

मुंबई तक

२२ वर्षीय टीकटॉक स्टार पुजा चव्हाणने पुण्यात केलेल्या आत्महत्येनंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात दोन व्यक्तींच्या संभाषणांच्या ऑडीयो क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पुजा चव्हाणचा राजकीय नेत्यांसोबतचा संपर्क आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये बंजारा भाषेतील संवादामुळे विरोधी पक्षातील भाजपने शिवसेनेचे यवतमाळचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

२२ वर्षीय टीकटॉक स्टार पुजा चव्हाणने पुण्यात केलेल्या आत्महत्येनंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात दोन व्यक्तींच्या संभाषणांच्या ऑडीयो क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पुजा चव्हाणचा राजकीय नेत्यांसोबतचा संपर्क आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये बंजारा भाषेतील संवादामुळे विरोधी पक्षातील भाजपने शिवसेनेचे यवतमाळचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विरोधी पक्षांनी संजय राठोड यांचं नाव घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पुन्हा एकदा संकटात सापडलेलं दिसतं आहे. पुजा चव्हाण प्रकरणात विरोधक ज्या संजय राठोडांवर आरोप करत आहेत ते आहेत तरी कोण आणि त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकिर्द आपण जाऊन घेणार आहोत…

अवश्य वाचा – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप्सची चौकशी करा-फडणवीस

संजय राठोड हे बंजारा समाजून येतात, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये केली. तरुण वयातच त्यांना यवतमाळचं शिवसेनेचं जिल्हाध्यक्ष पद मिळालं. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात संजय राठोड यांचा मोलाचा वाटा मानला जातो. २००४ साली झालेल्या निवडणुकीत संजय राठोड यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत पहिल्यांदा यवतमाळमध्ये भगवा फडकवला.

हे वाचलं का?

    follow whatsapp