Who is Shailesh Jejurikar: कोण आहेत शैलेश जेजुरीकर? जे बनले प्रॉक्टर अँड गॅम्बलचे पहिले भारतीय ग्लोबल COO

मुंबई तक

मुंबई: ग्राहक उत्पादने विकणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) ने शैलेश जेजुरीकर (Shailesh Jejurikar) यांची नवीन ग्लोबल सीओओ म्हणून नियुक्ती केली आहे. ही पहिलीच वेळ की एखादी भारतीय व्यक्ती ही पी अँड जी (Procter & Gamble)कंपनीच्या ग्लोबल सीओओ पदी नियुक्त झाली आहे. मुंबईत जन्मलेले 54 वर्षीय जेजुरीकर हे हैदराबाद पब्लिक स्कूलचे विद्यार्थी होते आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: ग्राहक उत्पादने विकणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) ने शैलेश जेजुरीकर (Shailesh Jejurikar) यांची नवीन ग्लोबल सीओओ म्हणून नियुक्ती केली आहे. ही पहिलीच वेळ की एखादी भारतीय व्यक्ती ही पी अँड जी (Procter & Gamble)कंपनीच्या ग्लोबल सीओओ पदी नियुक्त झाली आहे.

मुंबईत जन्मलेले 54 वर्षीय जेजुरीकर हे हैदराबाद पब्लिक स्कूलचे विद्यार्थी होते आणि याच शाळेत मायक्रोसॉफ्टचे सत्य नाडेला हे त्यांचे वर्गमित्र होते. सत्या नाडेला (Satya Nadella) हे जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रसिद्ध जागतिक सीईओ आहेत.

जेजुरीकर हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव व्यक्ती नाहीत ज्यांची मोठी ओळख आहे. त्यांचा मोठा भाऊ राजेश हे महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आहेत आणि त्यांना FMCG सेक्टरची पार्श्वभूमीही आहे. राजेश जेजुरीकर म्हणतात की, ‘भारतीय लोकांना जागतिक संस्थांच्या वरच्या क्रमांकावर जाताना पाहणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.’

54 वर्षीय शैलेश जेजुरीकर हे भारतीय वंशाच्या काही मोजक्या बिजनेस लीडर्सपैकी एक आहेत ज्यांच्याकडे परदेशी पदवी नाही. शैलेश जेजुरीकर यांनी 1987 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली होती. शैलेश यांनी 1989 साली IIM लखनऊमधून एमबीए केलं होतं. त्यानंतर लगेचच 1 जुलै 1989 रोजी ते पी अँड जी इंडियामध्ये सहाय्यक ब्रँड मॅनेजर (पर्सनल हेल्थकेअर) म्हणून रुजू झाले होते. जेजुरीकर यांची पदोन्नती हा P&G च्या नेतृत्व उत्तराधिकारी घोषणेचा एक भाग होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp