राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांचे उमेदवार असलेले यशवंत सिन्हा कोण आहेत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांची आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी (Presidential election 2022) विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. सिन्हा 27 जून रोजी सकाळी 11.30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज बोलताना टीएमसी नेते सिन्हा म्हणाले की पक्षीय राजकारणापासून दूर जाण्याची आणि राष्ट्रहितासाठी काम करण्याची वेळ आली आहे. TMC ने सर्वोच्च पदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला.

ADVERTISEMENT

“ममताजींनी मला TMC मध्ये जो सन्मान आणि प्रतिष्ठा दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता अशी वेळ आली आहे की, एका मोठ्या राष्ट्रीय कारणासाठी, मला पक्ष सोडून अधिक विरोधी ऐक्यासाठी काम करावे लागणार आहे. मला खात्री आहे की त्यांनी माझे टाकलेले हे पाऊल मान्य केले आहे,” असे ट्विट सिन्हा यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीत विरोधकांनी सिन्हा यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, सीपीआय, सीपीआय-एम, समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, AIMIM, आरजेडी आणि AIUDF यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

“सर्व पुरोगामी विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर यशवंत सिन्हा यांचे नाव सर्वसहमतीने जाहीर झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. एक महान आणि कुशाग्र माणूस, जो आपल्या महान राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मूल्यांचे नक्कीच पालन करेल,” असे ट्विट करत ममता बॅनर्जी यांनी सिन्हांचे अभिनंदन केले आहे.

टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “माझा ठाम विश्वास आहे की सर्व पुरोगामी पक्ष ज्यांचा देशासाठी समान दृष्टीकोन आहे, त्यांच्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही.” यापूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) प्रमुख फारूख अब्दुल्ला आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपाळकृष्ण गांधी यांची नावे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत होती.

ADVERTISEMENT

15 जून रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) विरोधात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी एकमत तयार करण्यासाठी 17 विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. पण संख्याबळ आपल्या बाजूने असल्याने एनडीए राष्ट्रपतीपदाची निवडणुकीत जिंकण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

कोण आहेत यशवंत सिन्हा?

* यशवंत सिन्हा हे राष्ट्रपती निवडणूक 2022 चे संयुक्त विरोधी पक्षांचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत.

* माजी भारतीय प्रशासक, राजकारणी आणि माजी अर्थमंत्री, मंत्री परराष्ट्र व्यवहार म्हणून त्यांनी काम केले आहे.

* पक्ष सोडण्यापूर्वी ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.

* त्यांनी 13 मार्च 2021 रोजी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

* पंतप्रधान चंद्रशेखर, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भूषवले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT