फेसबुक आणि इंस्टाग्राम यांनी महिन्याभरात दोन कोटींपेक्षा जास्त पोस्ट का डिलिट केल्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंस्टाग्राम आणि फेसबुक ही दोन अत्यंत प्रचलित सोशल मीडिया माध्यमं आहेत. या दोन्ही माध्यमांचा वापर करत नाही अशा व्यक्ती जगभरात कमीच असतील. तरूणांकडून या दोन्ही माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. फेसबुक आणि इंस्टा रिल्सही तरूणाईत चांगलीच प्रचलित आहेत. अशात फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही समाज माध्यमांनी महिन्याभरात दोन कोटींहून अधिक पोस्ट डिलिट केल्या आहेत.

ADVERTISEMENT

फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयटी अॅक्ट २०२१ अंतर्गत कारवाई

फेसबुक आणि इंस्टाग्रामने आयटी अॅक्ट २०२१ अंतर्गत दोन कोटींहून अधिक पोस्ट मागच्या महिन्याभरात डिलिट केल्या आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. दरवेळी त्यांचा हेतू हा निखळ मनोरंजन इतकाच नसतो. अनेकदा धर्माविषयी टिपण्णी करणाऱ्या, द्वेष पसवरणाऱ्या, विशिष्ट समाजाबाबत द्वेष पसरवणाऱ्या पोस्टही केल्या जातात. अशात दोन कोटींहून अधिक पोस्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामने डिलिट केल्या आहेत.

हे वाचलं का?

फेसबुक वापरता? मग आधी ‘हे’ काम करा, नाहीतर अकाऊंट होईल लॉक

फेसबुकने किती पोस्ट डिलिट केल्या आणि इंस्टाग्रामने किती पोस्ट डिलिट केल्या?

फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही समाजमाध्यमांनी आयटी अॅक्ट २०२१ अंतर्गत या पोस्ट डिलिट केल्या आहेत. फेसबुकने आणि इंस्टाग्रामने मिळून २.७ कोटी पोस्ट डिलिट केल्या आहेत. यामध्ये मेटाने १.७३ कोटी स्पॅम पोस्ट डिलिट केल्या आहेत तर २.३ कोटी हिंसक पोस्ट आणि ग्राफिक्स डिलिट केले आहेत.

ADVERTISEMENT

मेटाने जाहीर केलेल्या माहितीनुसार आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या, हिंसक विचारांना खतपाणी घालणाऱ्या, द्वेष पसवरणाऱ्या पोस्ट डिलिट करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे न्यूड फोटोशूट, सेक्शुअल कंटेट हे सगळंही फेसबुक आणि इंस्टाग्रामने हटवलं आहे. याबाबत युजर्सकडून आलेल्या तक्रारींनंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामने ही कारवाई केली आहे. युजर अशा प्रकारच्या पोस्टवर आक्षेप घेऊ शकतात. त्यांनी जे आक्षेप नोंदवले त्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामने याचं गांभीर्य ओळखून या पोस्ट डिलिट केल्या आहेत.

ADVERTISEMENT

फेसबुक आणि इंस्टाग्राम ही दोन्ही आहेत सर्वाधिक वापरली जाणारी माध्यमं

फेसबुक आणि इंस्टाग्राम ही दोन्ही माध्यमं मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. इंस्टाग्रामवर विविध प्रकारचे फोटो, व्हीडिओ आणि रिल्स युजर्स रोज पोस्ट करत असतात. क्षणाक्षणाला यावर अपडेट कंटेट येत असतो. तर फेसबुक हे माध्यमही तसंच आहे. या माध्यमावरही पोस्ट लिहिल्या जातात. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे फोटो, व्हीडिओ आणि रिल्सही पोस्ट केले जातात. यातून लोक व्यक्त होत असतात. मात्र आक्षेपार्ह अशा दोन कोटींपेक्षा जास्त पोस्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामने डिलिट केल्या आहेत. मेटाने त्यांच्या अहवालात ही माहिती दिली आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT