देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता अमित शाह यांनी कापल्याची चर्चा नेमकी का सुरू झाली आहे?
महाराष्ट्राच्या राजकारणात २१ जूनला सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे आपण भाजपसोबतच गेलं पाहिजे ही मागणीही लावून धरली. या सगळ्या बंडात एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतले ३९ आमदार गेले. त्यामुळे सरकार पडणार हे निश्चित झालं होतं ते तसं घडलंही. “मी ईश्वर साक्ष […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या राजकारणात २१ जूनला सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे आपण भाजपसोबतच गेलं पाहिजे ही मागणीही लावून धरली. या सगळ्या बंडात एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतले ३९ आमदार गेले. त्यामुळे सरकार पडणार हे निश्चित झालं होतं ते तसं घडलंही.
“मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की…” एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
सगळ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्यानंतर उत्सुकता होती ती शिंदे गटाच्या साथीने भाजप सत्तेत येणार याची. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील ही चर्चाही रंगली होती. ३० जूनच्या दुपारपर्यंत हीच चर्चा सगळीकडे रंगली होती. अगदी भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलनेही मी पुन्हा येईन ही देवेंद्र फडणवीस यांची कविता ट्विट करून या सगळ्या घडामोडींना एक अर्थ दिला.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना….. शरद पवार यांचा टोला