मुश्रीफांच्या मालमत्तांवर ED च्या धाडी, किरीट सोमय्यांचे आरोप काय?
ed raided at hasan mushrif’s properties update : अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) सुटकेमुळे आनंदीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (nationalist congress party) चिंतेत भर पडलीये. राष्ट्रवादीच्या (NCP) कोल्हापुरातील (kolhapur) मोठ्या नेत्याविरुद्ध ईडीने कारवाई सुरू केलीये. प्रकरण आहे आर्थिक गैरव्यवहारांचं (Money Laundering) आणि नेते आहेत हसन मुश्रीफ (hasan Mushrif). हसन मुश्रीफांच्या घर आणि मालमत्तांवर ईडीने छापेमारी केल्यानंतर सगळ्यांना […]
ADVERTISEMENT

ed raided at hasan mushrif’s properties update : अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) सुटकेमुळे आनंदीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (nationalist congress party) चिंतेत भर पडलीये. राष्ट्रवादीच्या (NCP) कोल्हापुरातील (kolhapur) मोठ्या नेत्याविरुद्ध ईडीने कारवाई सुरू केलीये. प्रकरण आहे आर्थिक गैरव्यवहारांचं (Money Laundering) आणि नेते आहेत हसन मुश्रीफ (hasan Mushrif). हसन मुश्रीफांच्या घर आणि मालमत्तांवर ईडीने छापेमारी केल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडलाय की, प्रकरण नेमकं काय? तेच आपण समजून घेऊ…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरासह इतर ठिकाणच्या मालमत्ता आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तांवर ईडीने छापे टाकले. बुधवारी सकाळी हे छापा सत्र सुरू झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पण, हे छापा सत्र ज्या प्रकरणामुळे सुरू झालं, त्याची सुरूवात 2021 मध्ये झालीये.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट आणि शिंदे गट) पक्षातील नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप सुरू केले होते. त्यातच एक नाव होतं हसन मुश्रीफांचं. किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे. किरीट सोमय्यांनी आरोप केले आणि आयकर विभागाकडे तक्रारही केली. त्यानंतर या प्रकरणाची ईडी आणि आयकरकडून चौकशी सुरू झालीये.
Hasan Mushrif Money laundering case : किरीट सोमय्या यांचे आरोप काय आहेत?
सोमय्यांच्या दाव्याप्रमाणे, ‘हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुबाने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग केलं. बेनामी संपत्ती विकत घेतली. याचे माझ्याकडे 2700 पानी पुरावे आहेत. सीआरएम सिस्टम प्रा. लि., प्रविण अग्रवाल म्हणून हिचा ऑपरेटर आहे. या कंपनीमधून हसन मुश्रीफांच्या मुलाने दोन कोटींचं कर्ज घेतल्याचं दाखवण्यात आलेलं आहे.