Prashant Kishor आणि शरद पवार यांच्या भेटीमागचं नेमकं कारण आहे तरी काय?

मुंबई तक

राजकीय जाणकार आणि रणनीतीकार प्रशांत किशोर हे शरद पवारांच्या भेटीला मुंबईत पोहचले आहेत. ही भेट चांगलीच चर्चेत आली आहे. याचं कारण तीन तासांहून अधिक काळ या दोघांमध्ये चर्चा सुरू झाली प्रशांत किशोर आणि शरद पवार हे दोघे मिळून नेमकी काय रणनीती ठरवतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रिया सुळे या सांगत आहेत की ही भेट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राजकीय जाणकार आणि रणनीतीकार प्रशांत किशोर हे शरद पवारांच्या भेटीला मुंबईत पोहचले आहेत. ही भेट चांगलीच चर्चेत आली आहे. याचं कारण तीन तासांहून अधिक काळ या दोघांमध्ये चर्चा सुरू झाली प्रशांत किशोर आणि शरद पवार हे दोघे मिळून नेमकी काय रणनीती ठरवतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रिया सुळे या सांगत आहेत की ही भेट राजकीय नाही. मात्र आपला इतका वेळ शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांना दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. नुकत्याच पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे प्रशांत किशोर चांगलेच चर्चेत आले आहेत. अशात शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट सुरू असल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन १० तारखेला पार पडला. यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेचं तोंड भरून कौतुक केलं. एवढंच नाही तर पुढच्या निवडणुका शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याचंही वक्तव्य केलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट झाली आहे. या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. शरद पवार हे नवं धोरण ठरवत आहेत का? 2024 च्या दृष्टीने ही भेट होती का? विधानसभा आणि लोकसभा निवडणूक शरद पवारांना केंद्र स्थानी आणून त्यांच्या नेतृत्वात विरोधकांची मोट बांधून लढवायची आहे का? या आणि अशा अनेक शक्यता या भेटीत चर्चिल्या गेल्या असाव्यात असे अंदाज लावले जात आहेत.

विधानसभा निवडणूक : प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला काय दिला सल्ला?

काय असू शकतात कारणं?

हे वाचलं का?