मुलांचा सांभाळ नीट करत नाही म्हणून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

मुंबई तक

पत्नी मुलांचा सांभाळ नीट करत नसल्याने पतीने तिला मारहाण केली. त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यात ही घटना घडली आहे. मुलांचा सांभाळ नीट करीत नाहीस, वेळेवर खाऊ घालत नाहीस, या कारणाने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. आसमा तौसिफ हवारी शेख (वय 35 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पत्नी मुलांचा सांभाळ नीट करत नसल्याने पतीने तिला मारहाण केली. त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यात ही घटना घडली आहे. मुलांचा सांभाळ नीट करीत नाहीस, वेळेवर खाऊ घालत नाहीस, या कारणाने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. आसमा तौसिफ हवारी शेख (वय 35 रा.कशेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तौसिफ हवारी शेख असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती तौसिफ आणि मयत पत्नी आसमा हे कशेवाडी तीन मुलासोबत राहण्यास आहेत.त्या दोघांमध्ये सतत वाद होत होते. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता पती तौसिफ याने मयत पत्नी आसमा हिला तू मुलांना नीट सांभाळत नाही.त्यांना जेवण नीट देत नाहीस,त्यांच्याकडे लक्ष दे,म्हणून बेदम मारहाण केली.त्यानंतर सर्व जण झोपी गेले. सकाळी सर्वजण उठले,पण पत्नी आसमा उठत नव्हती. त्यानंतर तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले.तिची तपासणी केली असता,डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे खडक पोलिसांनी सांगितले.

हे वाचलं का?

    follow whatsapp