श्रीकांत शिंदेंच्या विरोधात 2024 ला भाजप उमेदवार देणार?, केंद्रीय मंत्र्यांचं सुचक उत्तर…
मिथीलेश गुप्ता, प्रतिनिधी उल्हासनगर: कल्याण लोकसभा मतदारसंघातील गेल्या तीन वर्षात रखडलेल्या स्मार्ट सिटी विकास कामांसाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासनाला जबाबदार धरले आहे. येत्या काळात रखडलेल्या विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. केंद्राकडून महापालिका प्रशासनाकडे येणारा निधी विकासकामांसाठी वापरला जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सध्याचे […]
ADVERTISEMENT
मिथीलेश गुप्ता, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
उल्हासनगर: कल्याण लोकसभा मतदारसंघातील गेल्या तीन वर्षात रखडलेल्या स्मार्ट सिटी विकास कामांसाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासनाला जबाबदार धरले आहे. येत्या काळात रखडलेल्या विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. केंद्राकडून महापालिका प्रशासनाकडे येणारा निधी विकासकामांसाठी वापरला जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सध्याचे राज्य सरकार महापालिका प्रशासनाकडे पैसा खर्च करून विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
श्रीकांत शिंदे कल्याणमधून निवडणूक लढतील?
कल्याण लोकसभा मतदारसंघात 2024 च्या निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार असतील का? या प्रश्नावर ठाकूर म्हणाले, “कल्याण लोकसभा मतदारसंघात मागच्या दोन वेळेस शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार दिला आहे. हा विजय ताकदीवरती अवलंबून असतो, येथे भाजपची ताकद मोठी आहे. त्याचबरोबर आगामी काळात ही ताकद आणखी वाढवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते प्रयत्न करतील. कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला अजून बराच अवधी आहे, त्यावेळी बघू, असे सांगत ठाकूर यांनी प्रश्न टाळला.
हे वाचलं का?
अनुराग ठाकूर कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले होते. तसेच अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्याकडे भाजपचे मिशन 2024 म्हणून पाहिले जात आहे. दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसात मंत्री अनुराग ठाकूर आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बाइक रॅलीला हजेरी लावली, त्याचीही बरीच चर्चा झाली. दोन महिन्यांनी कल्याणला परत येण्याचे आश्वासन अनुराग ठाकूर यांनी दिले आहे. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरात तीन दिवस त्यांनी भाजपचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध संघटना, पोलीस, सरकारी अधिकारी आदींच्या भेटी घेऊन शहरातील समस्या जाणून घेतल्या. सायंकाळी सर्वसामान्यांच्या भेटी घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या दौऱ्याची सांगता झाली.
काय म्हणाले मंत्री अनुराग ठाकूर?
आजच्या दिवसाचा प्रवास कार्यकर्त्यांना भेटण्याचा, लोकसभा क्षेत्राची स्थिती जाणून घेण्याचा होता. संघटना कोणत्या भागात संघटना मजबूत करणे गरजेचे ते जाणून घेतले. केंद्र आणि राज्य सरकारच्या जमिनीवर किती योजना राबवल्या जात आहेत, किती यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. त्यात काय उणिवा आहेत… विशेषत: गरिबांसाठी असलेल्या केंद्राच्या प्रकल्पांचे लाभ पूर्णत्वाने राबवावेत आणि त्यात काय उणिवा आहेत, याची माहिती मिळवा. असे अनुराग ठाकूर म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
अनुराग ठाकूरांनी अधिकाऱ्यांना खडसावले
दुसऱ्या दिवशीच्या दौऱ्यात मंत्री अनुराग ठाकूर केडीएमसी कार्यालयात पोहोचले. केडीएमसी आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी स्मार्ट सिटी कंट्रोल रूममध्ये नेऊन त्यांना स्मार्ट सिटीचे काम दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी आयुक्त आणि अधिकाऱ्यांना खडसावले आणि कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटीमध्ये असल्याचे कळताच मला धक्का बसल्याचे सांगितले. इतर स्मार्ट शहरांमध्ये स्वच्छता, चांगले रस्ते, हॉट कल्चर, झाडे लावणे यावर भर दिला जातो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT