पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील का? एकनाथ खडसेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा या आशयाचं एक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. पंकजा मुंडे यांना पक्षात डावललं जातं आहे, पंकजा मुंडे यांना साईडलाईन करण्यात आलं आहे अशाही चर्चा आणि बातम्या येत असतात. अशात पंकजा मुंडे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा या आशयाचं एक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. पंकजा मुंडे यांना पक्षात डावललं जातं आहे, पंकजा मुंडे यांना साईडलाईन करण्यात आलं आहे अशाही चर्चा आणि बातम्या येत असतात. अशात पंकजा मुंडे या राष्ट्रवादीत प्रवेश करतील का? या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनीच दिलं आहे.

साधारण दीड ते दोन वर्षापूर्वी एकनाथ खडसे हे आपला भाजप हा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आले. ज्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. अनेकदा एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अशात आता पंकजा मुंडे या राष्ट्रवादीत येतील का? या प्रश्नाचं उत्तरही एकनाथ खडसे यांनी दिलं आहे.

काय म्हणाले आहेत एकनाथ खडसे पंकजा मुंडेंबाबत?

पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे भाजपच्या विस्तारासाठी काम केलं आहे. मात्र एक गोष्ट खरी आहे पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होतो आहे. तशी भावनाही सातत्याने जनतेत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत अशाही बातम्या येतात. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आवाहन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं की नाही? हा निर्णय सर्वस्वी पंकजा मुंडे यांचा आहे.

मात्र एक गोष्ट मान्य केली पाहिजे की त्यांनी वर्षानुवर्षे भाजपचं काम केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं मला वाटत नाही. असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp