Pornography Video Case : विदेश नागरिक असल्याचा Raj Kundra ला फायदा मिळणार? जाणून घ्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Hotshot mobile app च्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ बनवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. २३ जुलैपर्यंत राज कुंद्रा मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलच्या कोठडीत असणार आहे. राज कुंद्रा हा इंग्लंडचा नागरिक आहे. अशा परिस्थितीत विदेशी नागरिक असल्याचा राज कुंद्राला या प्रकरणात फायदा होईल का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांनी आयपीसी आणि IT Act अंतर्गत राज कुंद्रावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात राज कुंद्रा दोषी आढळला तर त्याला ५-७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. याआधीही ४ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात राज कुंद्रावर आयपीसीच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज कुंद्रा विदेशी नागरिक असल्यामुळे या केसवर काही परिणाम होऊ शकतो का याबद्दल तज्ज्ञ वकीलांचं मत जाणून घेण्यात आलं.

“राज कुंद्रा हा परदेशी नागरिक असला तरीही या खटल्यावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. सरकारी वकील सुनावणी दरम्यान हाच मुद्दा पकडून राज कुंद्राला जामीन दिल्यास तो भारत सोडून जाण्याची शक्यता आहे असा युक्तीवाद करु शकतात”, अशी माहिती दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष Advocate अभिजीत बल यांनी दिली. यावेळी बोलत असताना पोलीस या प्रकरणात राज कुंद्राचा सहभाग कसा सिद्ध करतात आणि पुरावे कशा पद्धतीने सादर करतात यावरही अनेक गोष्टी अवलंबून असल्याचं बल यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

राज कुंद्रा आणि विवाद हे नातं जुनच आहे. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सींग ते अंडरवर्ल्ंड प्रकरणात राज कुंद्राचं नाव याआधी समोर आलं आहे. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सींग प्रकरणी राज कुंद्रावर आजीवन बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसा तपास करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT