अधिवेशनाआधी संजय राठोड राजीनामा देणार? चर्चांना प्रचंड उधाण

मुंबई तक

मुंबई: २२ वर्षीय टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणात नाव आलेले वनमंत्री संजय राठोड राजीनामा देणार का? यावरुन पुन्हा चर्चांना उधाण आलेलं आहे. १ मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात विरोधीपक्षात असलेला भाजप सरकारला पूजा राठोड आत्महत्या प्रकरणावरुन घेरत संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकण्याची शक्यता आहे. शिवसेनेतला एक गटही राठोड यांच्याविरोधात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: २२ वर्षीय टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणात नाव आलेले वनमंत्री संजय राठोड राजीनामा देणार का? यावरुन पुन्हा चर्चांना उधाण आलेलं आहे. १ मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात विरोधीपक्षात असलेला भाजप सरकारला पूजा राठोड आत्महत्या प्रकरणावरुन घेरत संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकण्याची शक्यता आहे. शिवसेनेतला एक गटही राठोड यांच्याविरोधात नाराज आहे, त्यामुळे राजीनामा न घेतल्यास विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – अरूण राठोडने दिलेला तो नंबर कुणाचा? चित्रा वाघ यांचा सवाल

शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची वर्षा निवासस्थानावर बैठक पार पडली. या बैठकीला एकनाथ शिंदे, अनिल परब यांच्यासह महत्वाचे शिवसेना नेते हजर होते. या बैठकीत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाईल असा अंदाज बांधला जात होता. परंतू इकडे संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढवला जात आहे. शनिवारी भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन राठोड यांच्याविरोधात निदर्शनंही केली. अशा परिस्थितीत अधिवेशनात विरोधी पक्षाला वरचढ होऊ न देण्यासाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केला जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अवश्य वाचा – उद्धव ठाकरे ‘सत्यवादी’, Pooja Chavan ला न्याय मिळणारच-संजय राऊत

हे वाचलं का?