Sudhir मुनगंटीवार दिल्लीत जाणार?, भाजपमध्ये नव्या राजकारणाची सुरुवात

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sudhir Mungantiwar will go to Delhi politics: चंद्रपूर: भाजपचं (BJP) आतापासूनच मिशन लोकसभा 2024 सुरू केलं आहे. त्यासाठीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी चंद्रपूर (Chandrapur) आणि औरंगाबाद (Aurangabad) अशा दोन ठिकाणी सभा घेतल्या. पण, चंद्रपुरातल्या नड्डांच्या सभेनंतर चर्चा रंगली ती सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची. सुधीर मुनगंटीवारांना थेट दिल्लीत (Delhi) पाठवणार असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. पण, या चर्चा का रंगल्या? खरंच सुधीर मुनगंटीवारांनी दिल्लीत पाठवलं जाईल का? चंद्रपूर-वणी लोकसभा (Loksabha) मतदारसंघातली राजकीय गणितं काय? हे जाणून घेऊया. (will sudhir mungantiwar go to delhi strong discussion of new politics)

ADVERTISEMENT

मिशन 144 नुसार महाराष्ट्रातले 16 मतदारसंघ भाजपच्या हिटलिस्टवर आहेत. या मिशनचा शुभारंभ झाला तो चंद्रपुरातून. त्याची सुरुवात चंद्रपुरातून का झाली? तर त्यामागेही एक कारण सांगितलं जातं. काँग्रेसमुक्त भारत करायचा, असं भाजप नेते नेहमीच म्हणतात. त्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं ते चंद्रपुरात. कारण, इथं बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले. चार वेळा खासदार राहिलेले हंसराज अहीर यांचा पराभव झाला.

J.P. Nadda : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा ‘दर्गा’मध्ये; चादरही चढवली

हे वाचलं का?

हा भाजपला सर्वात मोठा धक्का होता. तेव्हापासून काँग्रेसकडे गेलेला हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थिती खेचून आणायचा असा निश्चयच भाजपनं केलेला दिसतोय. त्यासाठीच जे. पी. नड्डांची सभा झाली. नड्डांनी मुनगंटीवारांचं कौतुकही केलं. त्यानंतर मुनगंटीवारांना दिल्लीत पाठवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

आता भाजप खरंच मुनगंटीवारांना दिल्लीत पाठवू शकते का? त्यासाठी चंद्रपुरात मुनगंटीवारांचं किती वर्चस्व आहे आणि त्यांचे भाजपच्या नेत्यांसोबत कसे संबंध आहेत आपल्याला हे बघावं लागेल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला, तर हंसराज अहीर चार वेळा खासदार राहिले. 2004 पासून त्यांचं चंद्रपूरवर एकहाती वर्चस्व होतं. 2019 च्या निवडणुकीतही अहीर यांचा विजय होईल असं बोललं जात होतं. त्याचं कारण होतं अहीर आणि मुनगंटीवार गटाची निवडणुकीत एकत्र ताकद दिसायची. पण, 2019 चा निकाल लागला तेव्हा चित्र वेगळं होतं. हंसराज अहीर यांना मुनगंटीवारांच्या मतदारसंघात सर्वात कमी मतं मिळाली होती. पक्षांअंतर्गत कुरघोड्यांमुळे आपला पराभव झाला, असं अहीर यांनी वारंवार बोलू दाखवलं. 2019 पासून मुनगंटीवार आणि अहीर या दोन नेत्यांमधला संघर्षही लपून राहिला नाही. अहीर यांनी वेळोवेळी नाराजी बोलून दाखवली आहे.

चंद्रपुरातल्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 3 भाजपचे आमदार, तर दोन काँग्रेसचे आहेत. तर एक म्हणजे किशोर जोरगेवर हे अपक्ष आहेत. पण, सहाही मतदारसंघात आपली ताकद कशी वाढवता येईल? यासाठी अहीर आणि मुनगंटीवार तयारीला लागलेले दिसतात. अहीर आर्णी, कोरपणा, जिवती तालुक्यांपर्यंत दौरे करत आहेत, तर मुनगंटीवार आपल्या मतदारसंघात अडकून न राहता राजुरा, वरोरा या विधानसभा मतदारसंघात दौरे करत आहेत. अहीर यांची चंद्रपुरात ताकद आहे, तसंच मुनगंटीवारांचंही चंद्रपुरात वर्चस्व दिसतंय. शिवाय मुनगंटीवार यांचे फडणवीसांसोबत चांगले संबंध आहेत.

मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते सहा वेळा आमदार राहिले आहेत. भाजपनं त्यांना अर्थमंत्र्यांसारखी महत्वाची खातीही दिली. तसेच ते भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. ते उच्चशिक्षितही आहेत. इतकंच नाहीतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही दौऱ्यावेळी मुनगंटीवारांच्या कामाचं कौतुक केलं होतं. 2024 च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासमोर बाळू धानोरकर यांचं तगडं आव्हान असणार आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीचा उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं.

धानोरकर यांनी अहीर यांचा पराभव केला होता. उमेदवार बदलून दुसऱ्या कोणाला तरी संधी द्यायची असाही भाजपचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे भाजप ही संधी मुनगंटीवारांना देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

तुम्ही माझ्या नजरेला नजर भिडवत नाही आहात, असं सुधीर मुनगंटीवार भर विधानसभेत कुणाला म्हणाले? फडणवीसांनीही पाहिलं वाकून

चंद्रपुरात भाऊ आणि भैय्याचं राजकारण आहे. भाऊ म्हणजे सुधीर मुनगंटीवार आणि भैय्या म्हणजे हंसराज अहीर…आता येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देते? यासाठी आपल्याला 2024 ची वाट पाहावी लागेल. पण, भाजप मुनगंटीवारांना खरंच लोकसभेत पाठवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT