एक-दोन नव्हे तर तब्बल 27 बायकांसोबत राहणारा पती, 150 मुलं आणि बायकांवर लादतो विचित्र अटी
एका व्यक्तीने एक-दोन नव्हे तर तब्बल 27 लग्नं केल्याचं नुकतंच समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर या व्यक्तीला तब्बल 150 मुलं आहेत. वेगवेगळ्या विवाहातून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला ही संतती प्राप्ती झालेली आहे. याबाबत या व्यक्तीच्या 38 वर्षीय मुलीने सांगितलं आहे. तिचं म्हणणं आहे की, एका कुटुंबात इतकी माणसं असणं आणि त्याचं एकाच घरात राहणं […]
ADVERTISEMENT
एका व्यक्तीने एक-दोन नव्हे तर तब्बल 27 लग्नं केल्याचं नुकतंच समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर या व्यक्तीला तब्बल 150 मुलं आहेत. वेगवेगळ्या विवाहातून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला ही संतती प्राप्ती झालेली आहे. याबाबत या व्यक्तीच्या 38 वर्षीय मुलीने सांगितलं आहे. तिचं म्हणणं आहे की, एका कुटुंबात इतकी माणसं असणं आणि त्याचं एकाच घरात राहणं ही एक अतिशय रंजक गोष्ट असल्याचं मुलगी म्हणते.
ADVERTISEMENT
‘द सन’च्या रिपोर्टनुसार, कॅनडामध्ये राहणारे 65 वर्षीय विन्स्टन ब्लॅकमोर (Winston Blackmore) यांनी तब्बल 27 लग्न केली आहेत. तसेच विन्स्टन एकूण 150 मुले आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीचे नाव मेरी जेन ब्लॅकमोर (Mary Jayne Blackmore) आहे. तिनेच विन्स्टनच्या खऱ्या आयुष्याबाबत सांगितलं आहे.
27 लग्नं आणि 150 मुलं
हे वाचलं का?
Mormon Community मध्ये वाढलेली, मेरी जेन म्हणते की तिच्याकडे लहानपणी भावंडांची संपूर्ण फौज होती. जेव्हा ती 14 वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांना 12 बायका होत्या आणि त्यावेळी मेरीला 40 भावंडे होती. मात्र, नंतर वडिलांनी आणखी अनेक लग्नं केली आणि भावंडांची संख्या दीडशेवर पोहोचली.
मेरी जेनची आई विन्स्टन ब्लॅकमोरची पहिली पत्नी होती. जिच्या सोबत विस्टन ब्लॅकमोरने ब्रिटिश कोलंबियामध्ये वयाच्या 18 व्या वर्षी लग्न केले होते. मेरी म्हणते की, वयाच्या 26 व्या वर्षी वडिलांना बिशप बनवण्यात आलं. यानंतर, 1982 मध्ये, जेव्हा आई गरोदर होती तेव्हा वडिलांनी क्रिस्टीन हिच्याशी दुसरे लग्न केले. त्यानंतर मेरी अॅन त्याची तिसरी पत्नी झाली.
ADVERTISEMENT
मेरी 8 वर्षांची असताना देखील तिच्या वडिलांनीही चौथं आणि पाचवे लग्न केले. हळूहळू कुटुंब वाढत गेले आणि मेरीच्या भावंडांची संख्याही वाढत गेली. आतापर्यंत, मेरीचे वडील विन्स्टन यांनी 27 विवाह केले आहेत, ज्यातून त्यांना 150 मुले आहेत.
ADVERTISEMENT
कशी आहे लाईफस्टाइल?
मेरी जेन ब्लॅकमोर म्हणते की, ‘घरातील महिलांसाठी नियम कडक होते. मेकअप आणि स्टायलिश हेअर कटवर बंदी घालण्यात आली होती. आम्हाला आमच्या मानेपासून आमच्या मनगट आणि घोट्यापर्यंत स्वत:ला झाकून ठेवावे लागले. सिगारेट, दारू, चहा, कॉफी यांवर देखील बंदी घालण्यात आली होती. तसेच घरात टीव्ही, गाणी, कादंबऱ्यांवरही बंदी होती.’
ती पुढे असं म्हणाली की, ‘आमचा मोकळा वेळ वाद्ये वाजवण्यात, गाण्यात आणि नाचण्यात जात असे. नियम कडक असले तरी माझे बालपण खूप आनंददायी होते.’ मेरीचा वेळ तिची भावंडं, चुलत भाऊ आणि मैत्रिणींसोबत खेळण्यातच जात असे. पण वडिलांना किती बायका आहेत हे बाहेरच्या लोकांना सांगायला ती नेहमीच कचरत होती. कारण बहुपत्नीत्व हे तसंही बेकायदेशीर होतं.
एक-दोन नव्हे तर तब्बल 8 बायकांसोबत राहतो तरुण, प्रत्येकी सोबत रोमान्स करण्यासाठी वेळही ठरलेली!
वडिलांना शिक्षा झाली तेव्हा!
मेरी पुढे सांगते की, 2017 मध्ये तिच्या वडिलांवर बहुपत्नीत्वाचा आरोप होता. त्यानंतर 2018 मध्ये त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं आणि त्याला सहा महिने नजरकैदेची शिक्षा देण्यात आली. कॅनडात एका शतकाहून अधिक काळातील ही पहिली बहुपत्नीत्व शिक्षा होती. मेरीच्या मते, वडिलांनी केवळ माझ्या आईशी कायदेशीर विवाह केला होता आणि बाकी सगळे विवाह हे ‘आध्यात्मिक विवाह’ होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT