सॅनिटरी पॅडविषयीच्या प्रश्नावर महिला आयएएस अधिकाऱ्याचं वादग्रस्त उत्तर, नव्या वादाला तोंड फुटलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बिहार राज्यातील पाटणा शहरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला आयएएस अधिकारी एका विद्यार्थीने सॅनेटरी नॅपकिनबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अतिशय बेजबाबदारपणाने बोलत आहे. त्यामुळे अनेकांनी या महिला अधिकारीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आज सॅनिटरी पॅड सरकारने द्या म्हणतायेत उद्या कंडोमही द्या म्हणाल, असं वादग्रस्त उत्तर या महिला अधिकारीनं दिलं आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनत आहे. ‘सशक्त बेटी, समृद्ध बिहार’ शिबिरात एका महिला आयएएस अधिकाऱ्यानं हे वक्तव्य केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

प्रकरण नेमकं काय?

बिहारमध्ये एका ‘सशक्त बेटी, समृद्ध बिहार’ या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलींच्या जनजागृतीसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक मुलींना या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती. हरजोत कौर या महिला आयएएस अधिकारी या शिबिरात मुलींना मार्गदर्शन करत होत्या. शिबिरात एका मुलींनं उपस्थित महिला आयएएस अधिकाऱ्याला सॅनिटरी पॅड्सबाबत प्रश्न विचारला. मुलीनं सरकार 20-30 रुपयांचं सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का? असा प्रश्न विचारला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रश्नावर उत्तर देताना कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिला आयपीएस अधिकारी हरजोत कौर म्हणाल्या की, “या मागणीचा अंत आहे का? तुम्ही 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकता. तुम्ही उद्या जीन्स-पँट देऊ शकता, परवा शूज का देऊ शकत नाही? असे प्रश्न विचारले जातील. तसेच, जेव्हा कुटुंब नियोजनाचा प्रश्न येतो, तेव्हा कंडोम देखील विनामूल्य द्यावं लागेल, असं संतापजनक उत्तर त्यांनी दिलं. मुलीच्या योग्य प्रश्नावर संतापजनक उत्तर दिल्याने या महिला अधिकारीवर टीका होत आहे.

तर महिला आयएएस अधिकारी म्हणाल्या ‘मग मतदान करू नका’

ADVERTISEMENT

आयएएस अधिकाऱ्याच्या या उत्तराला उत्तर देताना विद्यार्थिनीचे म्हणणे होते की, देशात सरकार हे जनतेच्या मतांवरच बनते. यावर भामरा यांनी पलटवार करत हा मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, ‘ही मूर्खपणाची पराकाष्टा आहे. मग मतदान करू नका/पाकिस्तानात जा… तुम्ही पैसे आणि सेवांसाठी मत देता का?’ मुलगी लगेच म्हणते, ‘मी पाकिस्तानात का जाऊ? मी हिंदुस्थानी आहे, असं एकूणच या संभाषणादरम्यान घडलं.

ADVERTISEMENT

काय म्हणाली प्रश्न विचारणारी रिया कुमारी?

महिला आयएएस अधिकारीला प्रश्न विचारणाऱ्या रिया कुमारीचं सर्वत्र कौतुक होत आहे. मोठ्या धाडसानं तिने हा प्रश्न विचारला. यावर ती बोलताना म्हणाली माझा प्रश्न (सॅनिटरी पॅड्सवर) चुकीचा नव्हता. ती काही मोठी गोष्ट नाही, मी विकत घेऊ शकते. पण बरेच लोक झोपडपट्टीत राहतात आणि त्यांना सॅनिटरी नॅपकिन विकत घेणं परवडत नाहीत. म्हणून, मी फक्त माझ्यासाठी नाही तर सर्व मुलींसाठी तो प्रश्न विचारला होता, असं रिया कुमारीने प्रश्न विचारण्याच्या मागे काय हेतू होता हे स्पष्ट केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT