Sanjay Raut यांच्या अडचणींमध्ये भर, महिलेने केलेल्या गंभीर आरोपांची कोर्टाकडून दखल
मुंबईतील एका महिला मानसोपचार तज्ज्ञाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्याची दखल बॉम्बे हायकोर्टाने घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालावं असं कोर्टाने म्हटलं आहे. तसंच 24 जून रोजी या प्रकरणाचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असं कोर्टाने स्पष्ट केलं […]
ADVERTISEMENT
मुंबईतील एका महिला मानसोपचार तज्ज्ञाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्याची दखल बॉम्बे हायकोर्टाने घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालावं असं कोर्टाने म्हटलं आहे. तसंच 24 जून रोजी या प्रकरणाचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
ठाकरे सरकार जाईल सांगणाऱ्यांना उद्धव ठाकरे उत्तर देणार-संजय राऊत
संजय राऊत गेल्या सात वर्षांपासून आपला छळ करत आहेत. पाळत ठेवण्यासाठी त्यांनी माणसं लावली होती. हेरगिरी करणं, जीव घेण्याचा प्रयत्न करणं, शिवीगाळ, धमक्या देणं हे प्रकारही सुरू आहेत.
तक्रारदार महिला
हे वाचलं का?
On a woman's petition stating that she was stalked at the behest of Shiv Sena MP Sanjay Raut, Bombay High Court directs Mumbai Police Commissioner to look into her grievances & submit a status report to the court on June 24, when the matter will be taken up for hearing next
— ANI (@ANI) June 22, 2021
काय म्हटलं आहे कोर्टाने?
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यानुसार तक्रारदार महिलेवर पाळत ठेवल्याच्या आरोपा प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालावं आणि तक्रारीचं निवारण करावं. 24 जून रोजी यासंबंधीच्या सद्य स्थितीचा अहवाल सादर करावा’ असं बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊत गेल्या सात वर्षांपासून आपला छळ करत आहेत. पाळत ठेवण्यासाठी त्यांनी माणसं लावली होती. हेरगिरी करणं, जीव घेण्याचा प्रयत्न करणं, शिवीगाळ, धमक्या देणं असे अनेक गंभीर आरोप मुंबईतल्या मानसोपचार तज्ज्ञ महिलेने केले आहेत. या महिलेने बॉम्बे हायकोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत यमहिने मुंबई पोलिसांनाही प्रतिवादी केलं आहे. त्याच आधारे बॉम्बे हायकोर्टाने आता थेट मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणात महिलेच्या तक्रार निवारणाचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
या सगळ्या प्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करून संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. कोर्टाने संजय राऊत यांच्या प्रकरणात दिलेले आदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा अशी मी विनंती करतो. कारण माध्यमं हे वृत्त वाचून दाखवत नाहीत. संबंधित महिला गेल्या अनेक वर्षांपासून संजय राऊत यांच्या त्रासाला आणि जाचाला सामोरी जात आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच या महिलेला काही कारण नसताना अटकही करण्यात आली होती. संजय राऊत यांनी या महिलेच्या आयुष्याची वाट लावली असा आरोप करत निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT