महिला दिन विशेष: ‘होम मिनिस्टर’ फिट तर कुटुंब सुपरहिट!
गोंदिया: ‘होम मिनिस्टर’ म्हणून महिलांना नेहमीच संबोधलं जातं, 8 मार्च जागतिक महिला दिवस निमित्ताने गोंदिया शहरातील अनेक महिलांनी महिला दिवस साजरा करण्यासाठी ‘एक दिन सायकल के नाम’ हा आगळावेगळा उपक्रम राबवला. यावेळी अनेक महिलांनी सायकल चालवत पर्यावरण व आरोग्याच्या संदेश दिला. अशा प्रकारे महिलाची रॅली निघाल्याचं पहिल्यांदाच गोंदियावासियंना पाहायला मिळालं. (women in gondia celebrated womens […]
ADVERTISEMENT
गोंदिया: ‘होम मिनिस्टर’ म्हणून महिलांना नेहमीच संबोधलं जातं, 8 मार्च जागतिक महिला दिवस निमित्ताने गोंदिया शहरातील अनेक महिलांनी महिला दिवस साजरा करण्यासाठी ‘एक दिन सायकल के नाम’ हा आगळावेगळा उपक्रम राबवला. यावेळी अनेक महिलांनी सायकल चालवत पर्यावरण व आरोग्याच्या संदेश दिला. अशा प्रकारे महिलाची रॅली निघाल्याचं पहिल्यांदाच गोंदियावासियंना पाहायला मिळालं. (women in gondia celebrated womens day by cycling)
ADVERTISEMENT
विवाहित महिला म्हणजे घरच्या होम मिनिस्टरच, महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबाचे आरोग्य ही निरोगी राहते, असं म्हटलं जातं. मात्र, दिवसेंदिवस आधुनिक पद्धतीचा उपयोग आपल्या घरात, आहारात केला जातो. तसेच नोकरी करणाऱ्या महिला, गृहिणी यांना कामाच्या व्यस्ततेत आपला आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच की काय, महिलांमध्ये लठ्ठपणा आणि इतर आजारांना सामोरं जावं लागतं. अशावेळी वेळेवर उपचार न झाल्यास गंभीर आजारापणाला देखील त्यांना समोर जावं लागते. या समस्यांविषयी गंभीरतेने विचार करुन महिलांनी एकत्रित येऊन आपले आरोग्य निरोगी रहावे, यासाठी ‘एक दिन सायकल के नाम’ याद्वारे महिला दिन साजरा केला आहे.
यावेळी महिलांनी सायकल चालवून पर्यावरण, आरोग्यासंबंधी संदेश घरा-घरापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. आहेत. या उपक्रमात शहरातील नामांकित डॉक्टर, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या, गृहिणी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी शहरवासियांना सायकल चालवून ‘गृहिणी फिट तर कुटुंब सुपरहिट’ असा संदेश दिला आहे.
हे वाचलं का?
महिला दिनानिमित्ताने अमृता फडणवीस यांचं नवं गाणं येणार
अशा प्रकारचा उपक्रम गोंदिया शहरात पहिल्यांदाच शहरवासियांना पाहाव्यास मिळाला आहे. विशेष म्हणजे की ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम मागील तीन वर्षापासून सतत सुरु आहे. या उपक्रमाचा माध्यमातून प्रत्येक आठवड्याच्या रविवारी सायकल चालवून पर्यावरण व आरोग्याचा संदेश दिला जातो. या उपक्रमात जेसीआई गोंदिया राइस सिटी व आज फोरम यांचा मोलाचा वाटा आहे. आता हा उपक्रम प्रत्येक कुटुंबातील महिला-पुरुषसाठी उपयुक्त ठरत आहे.
ADVERTISEMENT
खर्चाची बचत व आरोग्यासाठी लाभदायक
ADVERTISEMENT
सायकल चालविण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. परंतु आरोग्यासोबतच खर्चाची ही बचत सायकलमुळे होत आहे. सायकल चालविल्याने चांगला व्यायाम होतो. जर प्रत्येक व्यक्तीने दररोज सायकलचा वापर केला तर इंधन बचती सोबत आपला खर्च देखील कमी होणार आहे. सध्याच्या परिस्थिति इंधनाचे दर हे गगनाला भिडले आहेत. अशावेळी सायकल हा एक उत्तम पर्याय आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT