पद्मगंधा प्रकाशनचे प्रकाशक, संपादक आणि लेखक अरूण जाखडे यांचं पुण्यात निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पद्मगंधा प्रकाशनचे प्रमुख अरुण जाखडे यांच पुण्यातील राहत्या घरी निधन झालय. ते 63 वर्षांचे होते. पहाटे झोपेतच त्यांच निधन झाल्याच कुटुंबीयांकडून सांगण्यात आलय. अरुण जाखडे यांनी पद्मगंधा प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून संशोधन आणि समिक्षणात्मक लिखाण प्रकाशित करण्यावर भर दिला होता

ADVERTISEMENT

र. धो. कर्वे यांच्याशी संबंधित साहित्य, रा. ची. ढेरे यांचे संशोधनातून पुढे आलेले साहित्य, डॉक्टर गणेश देवी यांचे भाषा प्रकल्पाच्या संबंधित लिखाण त्यांनी पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशीत केले. चारच दिवसांपुर्वी मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनिल मेहता यांच्या निधनाबद्दल त्यांनी दुखः व्यक्त केलं होतं. मात्र चार दिवसांनी त्यांच स्वतचही आकस्मिक निधन झालय. चार दिवसांच्या अंतराने मराठी प्रकाशन व्यवसायातील दोन बडे प्रकाशक काळाच्या पडद्याआड गेलेत.

अरुण जाखडे हे एक मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक. पद्मगंधा ही त्यांची प्रकाशनसंस्था. गणेश देवी, रा.चिं. ढेरे, व.दि. कुलकर्णी अशा मराठीतील अनेक लेखक-संशोधकांचे ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले आहेत.

हे वाचलं का?

विविध वृत्तपत्रांतून त्यांनी पाच वर्षांहून अधिक काळ सातत्याने लेखन केले आहे. त्यांच्या संपादकत्वाखाली ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ हे दिवाळी अंक निघतात.

ADVERTISEMENT

अरुण जाखडे यांचे गाव लहान होते. गावात पोस्टमन, शाळा, दवाखाना, एस.टी. वगैरे वगैरे काहीच नव्हते. त्यामुळे त्यांचे बालपणच नव्हे तर वयाची वीस वर्षे रानावनांत भटकण्यात, काट्याकुट्यातून चालण्यात, नद्या-ओढ्यांत बागडण्यात गेली. हायस्कूलसाठी थोड्याशा मोठ्या गावात ते गेले, बोर्डिगमध्ये राहिले. त्यांचे माझे महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले. एफ.वाय.बी.एस्सी.नंतर त्यांना नैराश्य आले आणि शिक्षणाला रामराम ठोकून ते कायम वास्तव्यासाठी गावी पततले. एक वर्षाने आईची भुणभुण टाळण्यासाथी ते परत नगतच्या काॅलेजात दाखल झाले. त्या एका वर्षात निसर्गातच नाही तर माणसे, कुत्री, जनावरे, पशुपक्षी यांच्यातही ते रमले. त्यांच्या या अनुभवाचा फायदा त्यांना ‘इर्जिक’ लिहिताना झाला.

ADVERTISEMENT

पद्मगंधा प्रकाशन १९९६ मध्ये स्थापन झाले. हे प्रकाशनगृह काल्पनिक कथांची मूळ, तसेच भाषांतरित पुस्तके प्रकाशित करते.

एरंडवणे येथे असलेले पद्मगंधा प्रकाशन अरुण जाखडे यांनी सुरू केले. बीएससीची पदवी मिळविल्यानंतर जाखडे नोकरीच्या शोधात अहमदनगरहून पुण्यात आले होते

पद्मगंधा प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जगभरातील तत्त्वज्ञान, आणि ललित कथांचे मराठी भाषेत अनुवाददेखील प्रकाशित केले आहेत. यामध्ये ‘अगाथा खिस्ती यांची हर्क्यूल पायरट मालिका’, पाउलो कोएल्हो यांची ‘द अलकेमिस्ट’ आणि ‘द जहीर’ ही पुस्तके, टोनी मॉरिसन यांचे ‘बिलव्हड’ हे पुस्तक, जीन पॉल सार्ट्रे यांचे ‘ली मॉट्स’ आणि सिमोन दी ब्यूवॉयर यांचे ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकांचा समावेश आहे. याबरोबरच महाराष्ट्रातील लोकसाहित्य, लावणीचा शैक्षणिक अभ्यास आणि साहित्यिक समीक्षा यांच्यावरील ४० हून अधिक पुस्तकेही प्रकाशित केली आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT